भारतीय जैन संघटनेतर्फे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:21 AM2021-05-16T04:21:06+5:302021-05-16T04:21:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : भारतीय जैन संघटनेतर्फे रविवार, १६ मे रोजी दुपारी ३ ते ५ दरम्यान ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : भारतीय जैन संघटनेतर्फे रविवार, १६ मे रोजी दुपारी ३ ते ५ दरम्यान महिलांसाठी उद्योग व्यवसायाबद्दल देश पातळीवरील मॅनेजमेंट गुरू राकेश जैन (इंदोर) हे राज्यस्तरीय ऑनलाईन झूम मिटिंगद्वारे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष केतन शहा यांनी दिली.
लॉकडाऊन काळात अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. अनेकांना कुटुंब व्यवस्था चालवणे अवघड झाले आहे. अशा काळात नोकरीच्या मागे न लागता स्वत:चे लघु उद्योग उभारावेत, यासाठी गृहणी ते उद्यमी या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत उद्योग कसा उभारावा, कुटुंब कसे चालवावे, अशा अनेक बाबींवर राकेश जैन हे मार्गदर्शन करणार आहेत. राज्य अध्यक्ष हस्तीमल बंब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीच्या संतोष बंब, सरला दुधेडिया, कांचन संघवे, सुवर्णा कटारे, माया पाटील, कामिनी गांधी, प्रवीणा सोलंकी, पंकजा पंडित, अभय सेठीया, नंदकिशोर साखला, श्याम पाटील, प्रवीणकुमार बलदोटा, देशभूषण व्हसाळे हे परिश्रम घेत आहेत.