रिमझिम पावसात कर्मचाऱ्याचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:28 AM2021-09-09T04:28:14+5:302021-09-09T04:28:14+5:30
दिवसभर सुरू असलेल्या रिमझिम रिमझिम पावसात आपल्या रोजीरोटीसाठी कोरोना कालावधीत काम करूनही उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. आमचे प्रश्न ...
दिवसभर सुरू असलेल्या रिमझिम रिमझिम पावसात आपल्या रोजीरोटीसाठी कोरोना कालावधीत काम करूनही उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. आमचे प्रश्न सोडवा या मागणीसाठी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून पंचायत समितीच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, गटविकास अधिकारी गणेश मोरे यांनी कर्मचाऱ्यांना बोलावून तुमचे प्रश्न १५ दिवसांत मार्गी लावू, असे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात १० ऑगस्ट २०२० च्या परिपत्रकानुसार सुधारित वेतन मिळावे, किमान वेतन व महागाई भत्ता यातील फरकाची रक्कम मिळावी, सर्व कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळावा, ग्रामपंचायत कर्मचारीसंदर्भातील सेवा पुस्तके व इतर सर्व रजिस्टर माहितीसह अद्ययावत करावीत, अशी मागणी केली होती.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष दत्ता पाटील, शिवाजी भालेराव, मनोज कांबळे, ज्ञानेश्वर खजूरकर, मनोहर कांबळे, दादासाहेब वाघमारे, श्रीमंत जाधव, तुकाराम क्षीरसागर, विठ्ठल राठोड, आकाश होमकर गैबी साहेब मुल्ला आदींची उपस्थिती होती.
----
उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांचे बहुतांशी प्रश्न ग्रामपंचायत स्तरावरच सुटणारे आहेत. यासाठी तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेची लवकरात लवकर बैठक बोलावू. त्यांचे प्रश्न १५ दिवसांत मार्गी लावू.
-गणेश मोरे, गटविकास अधिकारी
----
पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसलेले ग्रामपंचायत कर्मचारी.