सांगोला तालुक्यातील तेरा शाळांची घंटा वाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:16 AM2021-07-11T04:16:59+5:302021-07-11T04:16:59+5:30

चालू शैक्षणिक २०२१-२०२२ वर्ष १५ जूनपासून सुरू झाले असले तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अद्यापही शाळेची घंटा वाजली नाही. त्यामुळे ...

The bells of thirteen schools in Sangola taluka will ring | सांगोला तालुक्यातील तेरा शाळांची घंटा वाजणार

सांगोला तालुक्यातील तेरा शाळांची घंटा वाजणार

Next

चालू शैक्षणिक २०२१-२०२२ वर्ष १५ जूनपासून सुरू झाले असले तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अद्यापही शाळेची घंटा वाजली नाही. त्यामुळे सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक, खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक आदी ५३९ शाळेतील १ हजार ४९ शिक्षकांकडून ५५ हजार विद्यार्थ्यांना घरीच ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. तर ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्मार्टफोन व इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी शिक्षक झाडाखाली विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. असे असताना शासनाने जी गावे कोरोनामुक्त झाली आहेत, त्या गावात शासन जीआरनुसार ग्रामस्तरीय समितीचे अध्यक्षांनी गावात शाळा सुरू करायची किंवा नाही याबाबत ठराव घ्यायचा आहे. त्यानुसार ग्रामस्थांनी होकार दिल्यास कोविड १९ सर्व नियम पाळून इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली जाणार आहे.

या गावातील शाळा सुरू होणार

तालुक्यातील ३५ कोरोनामुक्त गावांपैकी आलेगाव, जुजारपूर, भोपसेवाडी, उदनवाडी, हलदहिवडी, किडेबिसरी, डिकसळ, लक्ष्मीनगर, मांजरी, नराळे, पाचेगाव खुर्द, वाणीचिंचाळे, हंगिरगे या गावात १५ जुलैपासून शाळेची घंटा वाजणार आहे. दरम्यान या १३ शाळेतील ५९ शिक्षक ७०३ विद्यार्थ्यांना अध्यापन करणार आहेत. त्याअनुषंगाने शिक्षकांनी कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर या शिक्षकांपैकी एखादा कर्मचारी बाहेर गावातून शाळेच्या ठिकाणी येत असेल तर त्यांनी सार्वजनिक वाहन साधनाचा वापर न करता खासगी वाहनाने शाळेच्या ठिकाणी यावे अशा सूचना दिल्या आहेत, असे गटशिक्षणाधिकारी प्रदीप करडे यांनी सांगितले.

Web Title: The bells of thirteen schools in Sangola taluka will ring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.