महाडीबीटीच्या खांद्यावर कृषी विभागाच्या लाभार्थ्यांची धुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:22 AM2021-03-27T04:22:52+5:302021-03-27T04:22:52+5:30
यापूर्वी शेतकऱ्यांना कृषी विभागात वारंवार हेलपाटे मारावे लागत असत. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाडीबीटी संकेतस्थळावर या योजनांचे मागणी अर्ज ...
यापूर्वी शेतकऱ्यांना कृषी विभागात वारंवार हेलपाटे मारावे लागत असत. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाडीबीटी संकेतस्थळावर या योजनांचे मागणी अर्ज सुरु झाल्यामुळे शेतकरी पुन्हा या योजनांचा फायदा घेण्यासाठी मागणी अर्ज करू लागले आहेत. यात फलोत्पादन योजना कांदा चाळ, पॅक हाऊस, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, फळबागांना आकार देणे, फळबाग लागवड, मधुमक्षिका पालन, हरितगृह, शेडनेट हाऊस, प्लास्टिक मल्चिंग, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावयाचे आहेत.
कोट ::::::::::::::::
यासाठी ७ /१२, ८ अ, बँक पासबुक, आधारकार्ड आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.
कृषी विभागाच्या सर्व योजना एका छताखाली आणल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा श्रम व वेळ वाया जाणार नाही. यासाठी गरजू लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्याला आवश्यक असणाऱ्या योजनांसंदर्भात संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन योजनेचा लाभ घ्यावा.
- गजानन ननावरे
तालुका कृषी अधिकारी, माळशिरस