सोलापूर जिल्ह्यातील सव्वापाच लाख शेतकºयांना मिळणार कृषी सन्मान योजनेचा लाभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 02:35 PM2019-02-05T14:35:29+5:302019-02-05T14:39:15+5:30

सोलापूर : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योेजनेसाठी सोलापूर जिल्ह्यात जवळपास सव्वापाच लाख शेतकºयांना लाभ मिळणार आहे. ...

Beneficiaries of Krishi Samman Yojana will fetch lakhs of farmers in Solapur district! | सोलापूर जिल्ह्यातील सव्वापाच लाख शेतकºयांना मिळणार कृषी सन्मान योजनेचा लाभ !

सोलापूर जिल्ह्यातील सव्वापाच लाख शेतकºयांना मिळणार कृषी सन्मान योजनेचा लाभ !

googlenewsNext
ठळक मुद्दे०१०-११ च्या कृषी गणनेनुसार जिल्ह्यात ४ लाख ४९ हजार ६४९ अल्पभूधारक शेतकरीकृषी गणना कार्यालयामध्ये आकडेवारीसाठी धांदल सुरूप्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आदेश आल्यानंतर शेतकरी संख्या अंतिम होईल.

सोलापूर : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योेजनेसाठी सोलापूर जिल्ह्यात जवळपास सव्वापाच लाख शेतकºयांना लाभ मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्यात शेतकºयाच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी २०१५-१६ च्या कृषी गणनेची आकडेवारी अंतिम करण्याची धांदल सुरू आहे.

केंद्र शासनाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात अल्पभूधारक शेतकºयांना दर महिन्याला पाचशे रुपये देण्याची तरतूद केली आहे. अल्पभूधारक व्याख्येनुसार पाच एकरापर्यंतचे क्षेत्र असलेला शेतकरी पंतप्रधान कृषी सन्मान योजनेसाठी पात्र राहणार आहे. याबाबत सविस्तर आदेश आला नसला तरी एक हेक्टरपर्यंत, दोन हेक्टरपर्यंत व दोन हेक्टर क्षेत्रावरील शेतकºयांचा आकडा अंतिम करण्याचे काम सध्या पुणे येथे कृषी गणना कार्यालयात सुरू आहे.

दर पाच वर्षांनंतर राज्यातील कृषी गणना केली जाते. २०१०-११ मध्ये केलेल्या कृषी गणनेत सोलापूर जिल्ह्यात एकूण ६ लाख ६७ हजार ९१० खातेदार होते. यामध्ये एक हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेले दोन लाख ३६ हजार ८१९, दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेले दोन लाख १२ हजार ८३० तर दोन हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या शेतकºयांची संख्या दोन लाख १८ हजार २६१ इतकी होती.

आता नव्याने २०१५-१६ या वर्षी कृषी गणना झाली असून त्याची अंतिम आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली नाही. केंद्र शासनाने अल्पभूधारक शेतकºयांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जाहीर केल्याने पुणे येथील कृषी गणना कार्यालयात क्षेत्राची आकडेमोड करण्याची धांदल सुरू आहे. दोन-तीन दिवसात आकडेवारी अंतिम होईल असे सांगण्यात आले.

अधिक माहिती विचारली असता अल्पभूधारक शेतकºयांची संख्या ५ लाख २० हजारांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात आले; मात्र शासन आदेशातील नियमावलीनुसार (बागायती- जिरायती) शेतकरी संख्या निश्चित होणार आहे. कृषी सन्मान योजनेमध्ये आपला समावेश व्हावा यासाठी अनेक शेतकºयांनी आॅनलाईन केंद्रावर विचारणा केली होती. दरम्यानच्या काळात नेटवर्कमुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. 

२०१०-११ च्या कृषी गणनेनुसार जिल्ह्यात ४ लाख ४९ हजार ६४९ अल्पभूधारक शेतकरी आहेत. यामध्ये मागील पाच वर्षांत अल्पभूधारक शेतकºयांची संख्या साधारण ११ टक्क्याने वाढली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आदेश आल्यानंतर शेतकरी संख्या अंतिम होईल.
- बसवराज बिराजदार
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

Web Title: Beneficiaries of Krishi Samman Yojana will fetch lakhs of farmers in Solapur district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.