शेतकऱ्यांनाच उपपदार्थ उत्पादनाचा फायदा : मोहिते-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:23 AM2021-04-01T04:23:07+5:302021-04-01T04:23:07+5:30
शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाची ४५वी ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. सभेस माजी उपमुख्यमंत्री ...
शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाची ४५वी ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. सभेस माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, मार्गदर्शक संचालक राजसिंह मोहिते-पाटील, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, उपाध्यक्ष सावता ढोपे यांच्यासह संचालक उपस्थित होते. कार्यकारी संचालक रविराज इनामदार-देशमुख यांनी विषयवाचन केले. त्यास सभासदांनी ऑनलाईन मंजुरी दिली.
कोरोनाच्या महामारीत दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत प्रचंड घट झाल्याने खासगी दूध उत्पादकांकडून शेतकऱ्यांना प्रतिलिटर १७ ते १८ रुपये दर दिला गेला. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना प्रतिलिटर २५ रुपयांप्रमाणे शिवामृत दूध संघामार्फत दर दिला. आपण केंद्र शासनाकडे दूध पावडर प्लँटचा प्रस्ताव दिला आहे, तो लवकरच मंजूर होईल, असे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले. तसेच संघाने कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी १० लाखांचा, तर मार्केटिंग विभागातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी २५ लाखांचा विमा उतरविला असल्याचेही त्यांनी सांगितले.