Beraking; सोलापुरातील खासगी रुग्णालयांची बिलं तपासणीसाठी १४ लेखापरीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:05 PM2020-07-23T12:05:06+5:302020-07-23T12:09:01+5:30
मनपा आयुक्तांकडून नियुक्ती : जनआरोग्य योजनेसाठी आरोग्य मित्रांची नावे जाहीर
सोलापूर : शहरातील खासगी रुग्णालयात दाखल कोरोनाबाधित रुग्णांच्या बिलांच्या तपासणीसाठी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी १४ लेखापरीक्षण अधिकाºयाची नियुक्ती केली. याशिवाय महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या आरोग्य मित्रांची नावे आणि त्यांचे नंबर बुधवारी जाहीर केले.
शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांच्या उपचारासाठी लाखो रुपये आकारले जात आहेत. राज्य सरकारने औषधोपचाराचे दर निश्चित केले आहेत. परंतु, अनेक रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा बिले आकाराली जात असल्याच्या तक्रारी येत आहे. रुग्णालयातील बिलांची तपासणी करण्यासाठी लेखापरीक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते.
खासगी रुग्णालयातील बिलांची प्रथम लेखापरीक्षकाकडून तपासणी होईल. रुग्णांच्या नातेवाईकांना बिलाबाबत काही अडचणी असतील तर त्या लेखापरीक्षक दूर करतील. महात्मा फुले जनआरोग्य योजनेबद्दलही अनेक नागरिकांना व्यवस्थित माहिती मिळत नाही. रुग्णालयांकडूनही सहकार्य मिळत नाही. ही अडचण दूर करण्याचे कामही लेखापरीक्षक आणि आरोग्य मित्रांवर सोपविण्यात आले आहे.
रुग्णालयाचे नाव आणि लेखापरीक्षक
- अश्विनी सहकारी रुग्णालय
- - अमोल मोहिते
- यशोधरा हॉस्पिटल
- - डॉ. वैभव राऊत
- मार्कंडेय हॉस्पिटल - विजयकुमार नारायणकर
- गंगामाई हॉस्पिटल आणि वळसंगकर हॉस्पिटल
- सीएनएस हॉस्पिटल - राहुल सलगर
- धनराज गिरजी हॉस्पिटल - विष्णू गाडे स्पर्श न्यूरो हॉस्पिटल आणि बलदवा हॉस्पिटल - प्रकाश शेंडगे
- लोकमंगल जीवक हॉस्पिटल - उमाकांत राजगुरू
- सिद्धेश्वर मल्टी हॉस्पिटल आणि डॉ. चिडगुपकर हॉस्पिटल
- नर्मदा हॉस्पिटल आणि विनीत हॉस्पिटल
- रघोजी आणि सिटी हॉस्पिटल
- - नितीन कुलकर्णी
- अल फैज चॅरिटेबल हॉस्पिटल
- - विशाल माने
- मोनार्क हॉस्पिटल
- - बाळासाहेब भारती
या आरोग्य मित्रांवर असेल जबाबदारी
अश्विनी रुग्णालय - अमोल शिंदे, यशोधरा हॉस्पिटल - फेरादील मुल्ला, मार्कंडेय हॉस्पिटल- शामसुंदर टंकसाल, गंगामाई हॉस्पिटल - सुनील पवार, विशाल पुडाल, सिद्धेश्वर मल्टी हॉस्पिटल - विकास माळवदकर, इमरान हिंनगीकर, डॉ. चिडगुपकर हॉस्पिटल - उमेश शिंदे, रघोजी किडनी हॉस्पिटल - शशिकांत गायकवाड, सिद्धाराम वाले, मोनार्क हॉस्पिटल - शशिकांत सकट