सीसीटीव्ही फुटेजवरून पकडले सुपारी चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:27 AM2021-08-13T04:27:00+5:302021-08-13T04:27:00+5:30

चित्तदुर्ग (गुलबर्गा) कर्नाटक राज्यातून शौकत अब्दुल रहिम (वय २७, रा. धवलेट, ता. पाहारी, जि. भरतपूर, राजस्थान) हा १७५ पोती ...

Betel nut caught from CCTV footage | सीसीटीव्ही फुटेजवरून पकडले सुपारी चोर

सीसीटीव्ही फुटेजवरून पकडले सुपारी चोर

Next

चित्तदुर्ग (गुलबर्गा) कर्नाटक राज्यातून शौकत अब्दुल रहिम (वय २७, रा. धवलेट, ता. पाहारी, जि. भरतपूर, राजस्थान) हा १७५ पोती एक टेम्पोत घेऊन अहमदाबादकडे निघाला होता. तो जातेगाव पास करून जात असताना समोर एक ट्रक व दोन कार आल्या. कारमधून तिघेजण उतरले व त्याने टेम्पो चालक रहिम यास जबरदस्तीने कारमध्ये घातले. त्याच्या जवळचे पाच हजार रुपये काढून घेऊन मारहाण केली व कारमधील लोकांनी त्याला देवळालीजवळ सोडले. त्यानंतर टेम्पोचालक शौकत रहिम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदवला. तपास फौजदार तानाजी पवार यांच्याकडे दिला.

-----

अशी लावली फिल्डिंग

या गुन्ह्याची उकल करण्यासाठी फौजदार पवार यांनी टेंभूर्णी ते नगरपर्यंतचे सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले. तसेच या कालावधीतील मोबाईलची माहिती घेतली. त्यातून २० ते २५ मोबाईल नंबर पक्के केले. त्याचे सीडीआर काढले आणि थेट मोबाईलधारकांपर्यंत म्हणजे बीड, पाटोदा इथपर्यंत स्वत: पोलीस निरीक्षक कोकणे व पोलीस उपनिरीक्षक पवार जाऊन आले. गोपनीय माहितीनुसार ११ ऑगस्टला चोरीची सुपारी विक्री करण्यासाठी एक मालट्रक करमाळा भागातून जाणार असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी पहाटेपासून पोथरे परिसरात नाकाबंदी केली. यावेळी दोघे सापडले. त्यामध्ये सौरभ दादासाहेब पवार व अनिल ऊर्फ गुलाब सुनील पवार (दोघे रा. कुसळंब, जि. बीड) यांचा समावेश होता, तर तत्पूर्वीच फरीद शमशोद्दीन शेख (रा. बावची, ता. परांडा) यालाही ताब्यात घेतले होते. या सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

Web Title: Betel nut caught from CCTV footage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.