सोलापूरकरांनो सावधान; सोलापूर शहराच्या ध्वनी आणि वायू प्रदूषण चिंताजनक वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 05:20 PM2021-11-18T17:20:45+5:302021-11-18T17:21:19+5:30

दिवसा आणि रात्रीच्या प्रदूषणात देखील सोलापूर प्रथम

Beware of Solapurkars; Worrying increase in noise and air pollution in Solapur city | सोलापूरकरांनो सावधान; सोलापूर शहराच्या ध्वनी आणि वायू प्रदूषण चिंताजनक वाढ

सोलापूरकरांनो सावधान; सोलापूर शहराच्या ध्वनी आणि वायू प्रदूषण चिंताजनक वाढ

googlenewsNext

सोलापूर : कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच दिवाळी उत्साहात झाली. या दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके फुटले आणि फटाक्यांचा आवाज ही मोठाच होता. अनेक ठिकाणी ध्वनी प्रदूषणाला आपण गंभीरतेने घेत नाही, प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक नियमावलींकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र हे प्रदूषण अदृश्य असून जीवघेणे आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा २०२१ चा अहवालानुसार महाराष्ट्रातील शहरात ध्वनी प्रदूषणात वाढ चिंताजनक आहे. ध्वनीचे प्रमाण हे ७० डेसिबलच्या पुढे गेल्यास त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. शहराच्या दिवसाच्या आणि रात्रीच्या प्रदूषणात वाढ झाली असून हे प्रमाण दिवसा सर्वाधिक ७८.४ - रात्री सर्वाधिक ७१.७ डेसिबल पर्यंत गेल्याचे या अहवालात आढळून आले. याशिवाय दिवसा आणि रात्रीच्या प्रदूषणात देखील सोलापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने असाच ध्वनी प्रदूषणाचा अभ्यास २२ व २३ डिसेंबर २०१९ रोजी घेण्यात आला होता, तेव्हा सुद्धा थोड्याफार फरकाने या सर्व शहरात ध्वनी प्रदूषण वाढलेले आढळले. गेल्या दहा वर्षांपासून मंडळ ध्वनी प्रदूषणाच्या नोंदी घेत आहेत. ध्वनी प्रदूषणाची ही निरीक्षणे प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे २१-२२ फेब्रुवारी २०२१ ला सुद्धा २७ शहरातील १०२ ठिकाणी घेण्यात आली. यात बहुतेक शहरात दिवसा आणि रात्री ध्वनी प्रदूषण सुरक्षित मानकापेक्षा व मर्यादेपेक्षा अधिक आढळले.

---

सोलापूरकरांसाठी ही धोक्याची घंटा

रंगभवन, महापालिका, ओरोनोका पूल, जुळे सोलापूर पाण्याची टाकी, नवे नियोजन भवन या ठिकाणाहून हवा प्रदूषणाचे मोजमाप घेतली जातात. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दैनंदिन घेण्यात आलेल्या चाचणीनुसार शहरातील हवा धाेक्याची पातळी ओलांडलेली आहे. शहरातील धुळीचे प्रमाण, झाडांची घटती संख्या व वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे हवेच्या प्रदूषणात वाढ होत आहे.

---

शहरातील हवा किती शुद्ध

शहरातील हवा प्रदूषणाचे प्रमाण ८० मिलीग्रॅमपर्यंत असून १५० पर्यंत ते धोक्याचे असते. सोलापूर शहरातील ११ नोव्हेंबर हवा प्रदूषणाचे प्रमाण १८६

  • ५ नोव्हेंबर १०१
  • ६ नोव्हेंबर ७५
  • ७ नोव्हेंबर ५६
  • ८ नोव्हेंबर ८९
  • ९ नोव्हेंबर ५७
  • १० नोव्हेंबर १०९
  • ११ नोव्हेंबर १८६

----

ध्वनी प्रदूषणामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक आजार होतात. यामध्ये बहिरेपणा, निद्रानाश, अस्वस्थता, डोकेदुखी, चिडचिडेपणा अशा आजारात वाढ होते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. -डॉ. जलील जहागीरदार, कान नाक घसा तज्ज्ञ  वायू प्रदूषणांमुळे दमा, अस्थमा, त्वचारोग, सर्दी, श्वसनविकार असे आजार वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणा, चिडचिडेपणा असे आजार उदभवू शकतात यामुळे बाहेर पडताना कान नाकाची काळजी घेणं गरजेचे आहे.

-डॉ. प्रसाद कोरुलकर,

 

Web Title: Beware of Solapurkars; Worrying increase in noise and air pollution in Solapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.