Breaking; भागवताचार्य वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे पुण्यात निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 04:51 PM2020-09-28T16:51:46+5:302020-09-28T16:53:07+5:30

सोलापूर लोेकमत ब्रेकींग

Bhagavatacharya Va. No. Utpat died due to corona | Breaking; भागवताचार्य वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे पुण्यात निधन

Breaking; भागवताचार्य वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे पुण्यात निधन

googlenewsNext

सोलापूर : पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष, ज्येष्ठ हिंदुत्वावादी, कट्टर सावरकर विचारवंत, भागवताचार्य वासुदेव नारायण उत्पात (वा़ना़उत्पात) यांचे वयाच्या ८० व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले़ दरम्यान, त्यांच्यावर पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते़ संत साहित्य, सावरकर साहित्यांवर त्यांचा गाढा अभ्यास होता, विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे ते सदस्य होते.

भागवताचार्य ह.भ.प. वा.ना. उत्पात हे सावरकर साहित्य, लोकसंगीत, लावणी या विषयांचे अभ्यासक आहेत. ते पंढरपूरचे राहणारे आहेत.

वा. ना. उत्पात हे गेल्या ३३ वर्षापासून पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे चातुमार्सात भागवत सांगत आहेत़ श्रीमदभागवताचा हा अखंड ज्ञानयज्ञ ३३ वर्षे अविरतपणे त्यांच्या हातून सुरू आहे. तसेच चातुमार्सात त्यांची ज्ञानेश्वरी प्रवचने देखील अनेक वर्षे सुरु होती.  ते रुक्मिणी मातेचे वंशपरंपरागत पुजारी होते़ ३९ वर्षे त्यांनी कवठेकर प्रशाला पंढरपूर  येथे संस्कृत, मराठी, इंग्रजी, इतिहास या विषयाचे अध्यापन केले. त्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यावर  संपूर्ण महाराष्ट्रात श्रीमदभागवत, रुक्मिणी स्वयंवर, ज्ञानेश्वरी यांचे सप्ताह, प्रवचने केली. विविध विषयांवर व्याख्याने देतात. पंढरपुरातील समाजकारण,राजकारण या मध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे़ ते २५ वर्षे नगरसेवक आणि २ वर्षे नगराध्यक्ष होते.

Web Title: Bhagavatacharya Va. No. Utpat died due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.