भारत भालके यांना आॅफर, शैला गोडसेंना तयारीचे आदेश; तर परिचारक म्हणतात, आम्हाला पुरस्कृत करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 11:41 AM2019-07-05T11:41:02+5:302019-07-05T11:44:42+5:30

पंढरपूर विधानसभा मतदारसंघ : उमेदवारीचा तिढा कायम, निवडून येईल तो आपला..

Bhalake Bharat, Shaila Godseena preparatory order; So the nurse says, reward us! | भारत भालके यांना आॅफर, शैला गोडसेंना तयारीचे आदेश; तर परिचारक म्हणतात, आम्हाला पुरस्कृत करा !

भारत भालके यांना आॅफर, शैला गोडसेंना तयारीचे आदेश; तर परिचारक म्हणतात, आम्हाला पुरस्कृत करा !

Next
ठळक मुद्देपंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची जागा युतीमध्ये ही गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडेगेल्यावर्षी निवडणूक लढविलेले उमेदवार समाधान आवताडे हे सध्या शिवसेनेत नसल्याने त्यांच्या उमेदवारीचा प्रश्न सध्यातरी नाहीराजकीय डावपेचात तरबेज असलेले आ़ भारत भालके हे लोकसभा निवडणुकीनंतर भाजप-सेनेच्या संपर्कात

पंढरपूर : शिवसेना महिला आघाडी प्रमुख शैला गोडसे यांना पक्षात प्रवेश देऊन विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले असताना आ़ भारत भालके यांना शिवसेनेच्या एका नेत्याने सेनेत येण्याची आॅफर दिली आहे़  परिचारक हे मतदारसंघावरील दावा सोडण्यास तयार नाहीत़ पक्षाकडून उमेदवारी मिळत नसेल तर आम्हाला पुरस्कृत करा, अशा भूमिकेत आहेत़ त्यामुळे उमेदवारीचा तिढा कायम आहे़ बंडखोरी झाल्यास निवडून येईल तो आपला हे सूत्र सत्ताधारी दोन्ही पक्षाकडून ठरण्याची शक्यता आहे.

विधानसभानिवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे़ त्यामुळे सत्ताधारी सेना-भाजप युतीसह काँग्रेस, राष्ट्रवादीने हमखास निवडून येण्याची क्षमता असणाºया उमेदवाराचा शोध सुरू केला आहे़ काँग्रेसचे आ़ भारत भालके हे दोन टर्मपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत़  गेल्या वर्षापासून काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक गड ढासळत आहेत़ विद्यमान आमदारांसह आजी-माजी पदाधिकारी सेना- भाजपच्या प्रमुख नेत्यांना भेटून आपल्यासाठी जागा तयार करून घेण्याच्या तयारीत आहेत.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची जागा युतीमध्ये ही गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आहे़ गेल्यावर्षी निवडणूक लढविलेले उमेदवार समाधान आवताडे हे सध्या शिवसेनेत नसल्याने त्यांच्या उमेदवारीचा प्रश्न सध्यातरी नाही़  गेल्या दोन वर्षांपासून कुरुल झेडपी गटाच्या सदस्या शैला गोडसे यांना जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी पक्षात प्रवेश देऊन महिला आघाडीचे जिल्हाप्रमुखपद दिले आणि विधानसभेची तयारी करण्याचे आदेश दिले़ त्यानुसार शैला गोडसे यांनी मतदारसंघात काम सुरू केले आहे़ त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल याची खात्री असताना राजकीय डावपेचात तरबेज असलेले आ़ भारत भालके हे लोकसभा निवडणुकीनंतर भाजप-सेनेच्या संपर्कात आहेत.

नाही होय म्हणत आ. भारत भालके यांनी मुख्यमंत्र्यांना कारखान्याच्या कामानिमित्ताने भेटल्याचे मान्य केले़ त्यांच्या आडून पक्षप्रवेशाची खलबतेही केल्याची चर्चा आहे़ मुख्यमंत्र्यांनी मात्र पक्षात यायचे असेल तर या, काम करा, अटी घालू नका, असे स्पष्ट सांगितल्याने त्यांनी आपला मोर्चा सेनेकडे वळविला आहे़ ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कासाठी धडपडत असताना सेनेतीलच एका बड्या नेत्याने सेनेत प्रवेश करण्याची आॅफर दिली आहे़ ही आॅफर भारत भालके स्वीकारणार का? असा प्रश्न आहे़
परिचारक गटाने पंढरपूर मतदारसंघाचे २५ वर्षे प्रतिनिधीत्व केले आहे़ मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर त्यांनी एक टर्म निवडणूक लढविली नाही़ तर दुसºया टर्मला प्रशांत परिचारक यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला होता़ यावेळी परिचारक गटही या मतदारसंघात सत्तापक्षासोबत राहत निवडणूक लढवायची तयारी करीत आहे़ ही जागा युतीतून सेनेकडे आहे़ परिचारक हे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत़ त्यामुळे उमेदवारीची अडचण आहे; मात्र काहीही करून निवडणूक लढवायची असा कार्यकर्त्यांचा दबाव असल्याने पक्षाकडून नसेल तर शिवसेनेकडून पुरस्कृत करा, अशी भूमिका परिचारक गटाने घेतली आहे.

काँग्रेसकडून शिवाजी काळुंगे, वंचितकडूनही चाचपणी
काँग्रेसकडून मंगळवेढ्याचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळुंगे यांनी काँग्रेसकडे आपला फॉर्म भरून अधिकृत उमेदवारीची मागणी केली आहे़ त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून स्वत: तयारी केली आहे़ लोकसभा निवडणुकीनंतर आत्मविश्वास मिळविलेल्या वंचित आघाडीने जातीय समीकरणे जुळवत उमेदवारी चाचपणी सुरू केली असली तरी निश्चित नाव समोर नाही़

Web Title: Bhalake Bharat, Shaila Godseena preparatory order; So the nurse says, reward us!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.