भंवर राठोड डिझाइन स्टुडिओची शाखा आता सोलापुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:23 AM2021-05-26T04:23:27+5:302021-05-26T04:23:27+5:30
या शाखेच्या माध्यमातून सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, विजयपूर, कलबुर्गी या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डिझाइन अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीचे ...
या शाखेच्या माध्यमातून सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, विजयपूर, कलबुर्गी या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डिझाइन अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीचे शिक्षण सोलापुरात उपलब्ध झाले आहे.
नववी, दहावी, अकरावी, बारावीत करिअरची पुढील दिशा ठरवणे आवश्यक असते. बारावीनंतर मेडिकल, इंजिनिअरिंग, बी. कॉम., बीएस्सी, बी. ए. या पारंपरिक अभ्यासक्रमांऐवजी भंवर राठोड डिझाइन स्टुडिओकडून (बीआरडीएस) नववी, दहावी, अकरावी, बारावीतच बॅचलर इन डिझाइन या पदवीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यात येते. तसेच बी. ई., बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, बॅचलर ऑफ डिझाइन आदी पदवीधारकांसाठी मास्टर ऑफ डिझाइन अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्यासाठीही बीआरडीएसकडून मार्गदर्शन करण्यात येते.
विद्यार्थ्यांना प्रॉडक्ट डिझाइन, फॅशन डिझाइन, ग्राफिक डिझाइन, फर्निचर डिझाइन, कम्युनिकेशन डिझाइन, जेम्स अँड ज्वेलरी डिझाइन, टॉय अँड गेम डिझाइन, लाइफ स्टाइल ॲक्सेसरीज डिझाइन, इंडस्ट्रियल डिझाइन, इंटरॲक्शन डिझाइन, युजर एक्सपिरिअन्स डिझाइन अशा अनेक विषयांमध्ये बॅचलर इन डिझाइनची पदवी मिळवता येते.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनच्या २०१९ च्या परीक्षेत बीआरडीएसचे तब्बल १६३ विद्यार्थी निवडले गेले. विशेष म्हणजे त्यातील १० विद्यार्थी भारतात प्रथम १० विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या मागील वर्षीच्या परीक्षेत ५९० विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेत यश मिळवले. नाटा, जेईई पेपर २ (बॅचलर ऑफ आर्किटेक्चर) मध्येही बीआरडीएसच्या देशातील विविध शाखांमधील एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळवत आर्किटेक्चर करिअर निवडले.
यापूर्वी सोलापूरचे विद्यार्थी मुंबई, पुणे, अहमदाबाद अशा शहरांत जाऊन बीआरडीएसच्या तेथील शाखेत शिक्षण घेत होते. प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना बाहेर जावे लागत होते. त्यामुळे सोलापूर शहर आणि परिसरातील विद्यार्थ्यांना हे शिक्षण सोलापुरातच राहून घेता यावे, यासाठी देशभरातील १०० हून अधिक नामवंत डिझाइन अभ्यासक्रमांच्या संस्थांच्या प्रवेश परीक्षा तयारीची सोय बीआरडीएसने उपलब्ध करून दिली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी बीआरडीएसच्या सात रस्ता येथील तळवलकर जीमच्या वर चौथ्या मजल्यावरील स्टुडिओला भेट द्यावी तसेच अधिक माहितीसाठी ६३५७३५७५९८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सेंटर हेड धर्मेश टांक यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेस सेंटर हेड
धर्मेश टांक, हिना टांक, आयआयटी मुंबईच्या एम. डेस.चे विद्यार्थी प्राची टांक, आत्मन शहा आदी उपस्थित होते.
०००००००००००००००
कोरोनाकाळानंतर डिझायनरला चांगल्या संधी
कोरोनानंतरच्या काळात बदललेल्या परिस्थितीत डिझाइन क्षेत्रात प्रचंड वेगाने करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. या क्षेत्रातील कंपन्या डिझायनरला सुरुवातीलाच सरासरी वार्षिक तब्बल सहा ते दहा लाख रुपयांची पगार देऊ करतात. त्यामुळे या क्षेत्राकडे वळणाऱ्या युवकांची संख्या वाढत असल्याचेही श्री. टांक यांनी सांगितले.