भारत भालके यांना श्रद्धांजली म्हणून भगीरथ भालकेंना मदत करणार : दिलीप धोत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:20 AM2021-04-12T04:20:45+5:302021-04-12T04:20:45+5:30

मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे हे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रशांत गिड्डे, शशिकांत पाटील, अनिल बागल, बाळासाहेब चौगुले ...

Bharat will help Bhagirath Bhalke as a tribute to Bhalke: Dilip Dhotre | भारत भालके यांना श्रद्धांजली म्हणून भगीरथ भालकेंना मदत करणार : दिलीप धोत्रे

भारत भालके यांना श्रद्धांजली म्हणून भगीरथ भालकेंना मदत करणार : दिलीप धोत्रे

Next

मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे हे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रशांत गिड्डे, शशिकांत पाटील, अनिल बागल, बाळासाहेब चौगुले उपस्थित होते.

पुढे धोत्रे म्हणाले, श्री विठ्ठल कारखाना अडचणीत असताना, कारखान्याला तन, मन धनाने मदत केली. संस्था राहिली पाहिजे. शेतकरी जगला पाहिजे याच हेतूने मी मदत केली आहे. ज्या पक्षाची सत्ता असते तेच विकास कामे करू शकतात. त्यामुळे भगीरथ भालके यांच्या माध्यमातून शहरातील विकास कामे करुन घ्यायची आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत भालकेंना सहकार्य करणार असल्याचे मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली होती धोत्रेंची भेट :::::

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना मनसेने पाठिंबा जाहीर केला आहे. यानंतर मनसेचे स्थानिक नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार देखील करत आहेत. यामुळे या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचं पारडं जड झाले आहे. परिचारक गटाच्या नेत्यांच्या घरी भेट दिल्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या घरी भेट दिली होती. या भेटी दरम्यान नागरिक व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कधी काम सांगा असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीप धोत्रे यांना दिला होता.

फोटो ::::::

पत्रकार परिषदेत बोलताना मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे, प्रशांत गिड्डे, शशिकांत पाटील, अनिल बागल, बाळासाहेब चौगुले उपस्थित होते.

Web Title: Bharat will help Bhagirath Bhalke as a tribute to Bhalke: Dilip Dhotre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.