भरणेमामांना सोलापूरचं पालकमंत्री केलं गं बया, यांनीच उजनीचं पाणी इंदापूरला नेलं गं बया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 12:46 PM2021-04-25T12:46:05+5:302021-04-25T12:47:15+5:30
महिलांचा आर्त टाहो: पालकमंत्र्यांचा पुतळा उजनीत बुडवून निषेध
करमाळा : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून इंदापूर (जि. पुणे) तालुक्यातील खडकवासला कालव्यावरील गावांतील शेतीसाठी कालव्यावरील शेती सिचंन व निरा डावा पाच टीएमसी पाणी उचलण्यास राज्य परवानगी दिली आहे. त्यामुळे सोलापुरकरांच्या तोंडचं पाणी पळविणाऱ्या पालकमंत्र्यांवर सर्वपक्षीय भडकले आहेत.
याद राखा .पाण्याला हात लावाल तर..अशा संतप्त प्रतिक्रिया नेत्यांनी दिल्या . सोलापूर जिल्ह्याच्या नशिबी फक्त गाळ ठेवणार की काय ? अशा प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या नियोजनाखाली मंत्री भरणे यांचा हा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू होता.
या प्रस्तावावर दि.२२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी झाली असून , जलसंपदा मंत्रालयाने याबाबत शासन निर्णय पारित केल्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
खडकवासला कालव्यावरील शेटफळगळेपासून बेडशिंगेपर्यंत ३६ गावांना उन्हाळी आवर्तनात शेतीला पाण्याची तीव्र टंचाई जाणवत होती. याशिवाय निरा डावा कालव्यावरील २२ गावांचा पाणी प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता.
इंदापूर विधानसभेच्या प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत २२ गावांचा पाणी प्रश्न हा कळीचा मुद्दा होता. हा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी मंत्री भरणे यांचा पाठपुरावा चालू होता. वारंवार या योजनेवरून भरणे यांनी उजनी विरोधकांना खडे बोल सुनावले होते.
भरणेंना सोलापूरचं पालकमंत्री केलं गं बया, यांनीच उजनीचं पाणी इंदापूरला नेलं गं बया महिलांचा आर्त टाहो : पालकमंत्र्यांचा पुतळा उजनीत बुडवून निषेध
दत्तात्रय भरणे यांना सोलापूरचा पालकमंत्री केलं गं बया, यांनीच उजनीचं पाणी इंदापूरला नेलं गं बया ' असा आर्त टाहो फोडत महिलांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा पुतळा उजनी जलाशयात बुडवून निषेध केला.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी जलाशयातून ५ टीएमसी पाणी इंदापूरला नेले असून , या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीदेखील स्वाक्षरी झालेली आहे. इंदापूरकरांसाठी हा ऐतिहासिक निर्णय असल्याच्या बातम्या सोलापूर जिल्ह्यात धडकल्या आणि याच निर्णयाविरोधात जिल्ह्यातील शेतकन्यांमध्ये रणकंदन माजले.
पालकमंत्री भरणे यांच्या या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात शेतकरी संघटनेचे अतुल खुपसे-पाटील यांनी उजनी धरणात शनिवारी सायंकाळी ४ वाजता आंदोलन करीत पालकमंत्री भरणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची तिरडी करून अंत्यविधी करीत पुतळ्याला उजनी जलाशयात बुडवून निषेध केला.
अतुल खुपसे पाटील म्हणाले, एकीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून घ्यायचे आणि दुसरीकडे जिल्ह्याला अनाथ करायचे. हा भरणे यांचा दतोंडी उजनीत बुडवून निषेध खेळ आहे. भलेही इंदापूरकरांसाठी ही आनंददायी बातमी असली तरी सोलापूर जिल्हावासीयांसाठी वेदनादायी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी हा निर्णय त्वरित मागे घ्यावा , अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडू , असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी महिलांनी आमच्या हक्काचं पाणी का चोरलं ओ, अशा ओव्या गाऊन रडारडी केली. या आंदोलनात विठ्ठल मस्के, राणा महाराज, जयसिंग पाटील, दीपाली डिरे, सुवर्णा गुळवे, दत्ता डिरे, हणू कानतोडे, अतुल राऊत, सूरज कानतोडे यांनी सहभाग नोंदविला.