भातंबरेत मुलगी सरपंच, तर वडील उपसरपंच बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:42 AM2021-02-28T04:42:28+5:302021-02-28T04:42:28+5:30
भातंबरे ग्रामपंचायतीवर सलग २५ वर्षे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या गटाची सत्ता आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जाधव ...
भातंबरे ग्रामपंचायतीवर सलग २५ वर्षे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या गटाची सत्ता आहे.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जाधव यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेवक व्ही. सी. पठाण, तलाठी भोसकर व लिपिक पप्पू फंड यांनी सहकार्य केले. यावेळी अमोल वाघमोडे, कुंडलिक वाघमोडे, रमेश वाघमोडे, सुधाकर वाघमोडे, अब्दुल शेख, रामहरी शिराळ, नंदकुमार वाघमोडे, संजय खुने, विशाल पाटील, विनोद माने, बाप्पा मोहिते, शरद खुने, हजरत बागवान, प्रशांत गाढवे, काका परीट, नाना परीट, नरहरी वाघमोडे, भगवान वाघमोडे, बाळू खुने, आप्पा पाटील, किरण वाघमोडे, ओंकार शिराळ, विलास वाघमोडे, कैलास परीट, चंद्रकांत परीट, पांडुरंग यादव, ॲड. किरण झोंबाडे, अविनाश गुंड, कबीर शेख, सुहास पोतदार, महादेव यादव, अविनाश वाघमोडे, गोपाळ वाघमोडे, सुजित झोंबाडे, नीलेश वाघमोडे, सागर वाघमोडे, महादेव वाघमोडे आदी उपस्थित होते. ढोल-ताशाच्या गजरात, फटाक्याची आतषबाजी करून गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य वैशाली अनंत वाघमोडे, विमल मोहन झोंबाडे, विजयकुमार वाघमोडे, अशोक घरबुडवे उपस्थित होते.
कुटुंब रंगलंय राजकारणात
मुलगी अश्विनी वाघमोडे या भातंबरे ग्रामपंचायतीच्या सरपंच झाल्या. तसेच वडील प्रमोद वाघमोडे हे उपसरपंच झाले. त्यापूर्वीच आई मंजुळा वाघमोडे या बार्शी पंचायत समितीच्या उपसभापती आहेत. भातंबरेतील वाघमोडे अख्ख कुटुंबच राजकारणात रंगल्याची गावात चर्चा सुरू आहे.
फोटो
२७भातंबरे-अश्विनी वाघमोडे
२७भातंबरे- प्रमोद वाघमोडे