भीम युवासेनेच्या वतीने टेंभुर्णीच्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:18 AM2021-06-02T04:18:15+5:302021-06-02T04:18:15+5:30
टेंभुर्णी येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे व इतर कर्मचारी शनिवारी दुपारी गावातील मागासवर्गीय वस्तीत आले. त्यांनी ...
टेंभुर्णी येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे व इतर कर्मचारी शनिवारी दुपारी गावातील मागासवर्गीय वस्तीत आले. त्यांनी तेथील महिलांना,लहान मुलांना व पुरुषांना अर्वाच्च भाषा वापरून मारहाण केली. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने घरातून बाहेर काढून घाण कचरा,मानवाची विष्ठा उचलायला लावली. त्यामुळे त्यांच्यावर विनयभंग, ॲट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा,त्याला सेवेतून निलंबित करून कारवाई करावी, अन्यथा भीमसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे युवा भीमसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.
निवेदनावर जिल्हा संघटक नागेश आडसूळ, तालुका अध्यक्ष विलास साठे, कुर्डूवाडी शहराध्यक्ष सूरज अस्वरे यांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे ईमेलद्वारे पाठविल्या आहेत.
.................