भीमा कारखाना निवडणूक मतमोजणी; दोन्ही गटाकडून चुरशीची लढत, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 05:04 PM2022-11-14T17:04:29+5:302022-11-14T17:07:09+5:30
पुळूज ऊस उत्पादक गटात महाडिक गटाचे विश्वराज महाडिक यांना ५८२६ , बिभीषण वाघ याना ५६२१ मते मिळाली आहेत तर विरोधी भीमा बचाव परिवर्तन पॅनेलचे उमेदवार देवानंद गुंड यांना २१७७ , कल्याणराव पाटील यांना २२२९ मते मिळाली.
सोलापूर/कुरुल - राजकीय दृष्टया महत्वाची समजली जाणारी भीमा सहकारी साखर कारखान्यांच्या मतमोजणी सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून काडादी मंगल कार्यालयात सुरू झाली. यात भीमा सहकारी साखर कारखाना पहिल्या फेरीचा निकाल अधिकृतपणे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी जाहीर केला.
पुळूज ऊस उत्पादक गटात महाडिक गटाचे विश्वराज महाडिक यांना ५८२६ , बिभीषण वाघ याना ५६२१ मते मिळाली आहेत तर विरोधी भीमा बचाव परिवर्तन पॅनेलचे उमेदवार देवानंद गुंड यांना २१७७ , कल्याणराव पाटील यांना २२२९ मते मिळाली. संस्था गटात खासदार धनंजय महाडिक यांना ४३ पैकी ३१ मते मिळून विजयी घोषित करण्यात आले. विरोधी गटातील राजेंद्र चव्हाण यांना १२ मते मिळाली आहेत. टाकळी सिकंदर ऊस उत्पादक गटात महाडिक गटाचे संभाजी चव्हाण यांना ५८१०, सुनील चव्हाण यांना ५८२२ मते मिळाली आहेत तर भीमा बचाव पॅनलच्या शिवाजी भोसले यांना २२५० तर राजाराम माने यांना २१५३ मते मिळाली आहेत.
सुस्ते ऊस उत्पादक गटात महाडिक गटाचे तात्या नागटीळक यांना ५७९५ , संतोष सावंत याना ५५३७ मते मिळाली आहेत तर बचाव पॅनलच्या पंकज नायकोडे याना २१९९ आणि विठ्ठल रणदिवे याना २१३३ मते मिळाली आहेत. अंकोली ऊस उत्पादक गटात महाडिक गटाचे सतिश जगताप यांना ५७०३ , गणपत पुदे यांना ५५५७ मते मिळाली आहेत तर बचाव पॅनलचे भारत पवार यांना २१७६ ,रघुनाथ सुरवसे यांना २०५२ मते मिळाली आहेत.
कोन्हेरी ऊस उत्पादक गटात महाडिक गटाचे राजेंद्र टेकळे यांना ५७६६ तर बचाव पॅनलचे कुमार गोडसे यांना २४१६ मते मिळाली आहेत. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात महाडिक गटाचे बाळासाहेब गवळी यांना ५७७५ तर बचाव पॅनलच्या भारत सुतकर यांना २२७५ मते मिळाली आहेत. महिला राखीव मतदारसंघात महाडीक गटाच्या सिंधू चंद्रसेन जाधव यांना ५८६१ , प्रतीक्षा बाबुराव शिंदे यांना ५७०९ मते मिळाली आहेत तर बचाव गटाच्या अर्चना दिलीप घाडगे याना २२३० , सुहासिनी शिवाजी चव्हाण यांना २१९२ मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीत महाडिक गटाने विरोधी भीमा बचाव परिवर्तन पॅनल वर सरासरी ३६०० मताधिक्य घेतले आहे. दुसऱ्या फेरीतील मतमोजणी सुरू झाली आहे.