भोयरेत रंगला दगडफेकीचा खेळ, जगदंबा देवीची महती: खेळाला प्राचीन परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 01:17 PM2018-03-05T13:17:17+5:302018-03-05T13:17:17+5:30

महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होळी, धुलिवंदन साजरे होत असते. मात्र भोयरे (ता. मोहोळ) येथे धुलिवंदन एकमेकांना दगड मारुन साजरे केले जाते.

Bhoyare Rang Rangoli game, Jagdamba Devi ki Mahi: The ancient tradition of the game | भोयरेत रंगला दगडफेकीचा खेळ, जगदंबा देवीची महती: खेळाला प्राचीन परंपरा

भोयरेत रंगला दगडफेकीचा खेळ, जगदंबा देवीची महती: खेळाला प्राचीन परंपरा

Next
ठळक मुद्देदगड लागून जखमे झाले तरी दवाखान्यात उपचार घेतले जात नाही. त्या जखमेवर देवीचा अंगारा लावल्यास ती जखम बरी होत असल्याची भाविकांची भावनारोष, शत्रुत्व, द्वेष मनात न ठेवता दगडाची एकमेकांवर उधळण केली जातेमंदिराच्या पायथ्याशी थांबलेल्या गटाची दगडं फक्त धुलिवंदन दिवशी वर दुसºया गटापर्यंत पोहोचतात


हणमंत पवार
आॅनलाइन लोकमत सोलापूर
नरखेड दि ५ : महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होळी, धुलिवंदन साजरे होत असते. मात्र भोयरे (ता. मोहोळ) येथे धुलिवंदन एकमेकांना दगड मारुन साजरे केले जाते. याला जगदंबादेवीचा दगडफेकीचा खेळ असे म्हणतात. याला परंपरा असून, हा खेळ भाविक आनंदाने खेळत असतात.
भोयरेमध्ये धुलिवंदन दिवशी दुपारी ४ ते ५ च्या दरमान्य श्री जगदंबादेवीच्या पावन नगरीमध्ये आलेले भाविक मंदिरातून दर्शन घेऊन पुजाºयासह भोगावती नदीच्या दिशेने जातात. नदीमध्ये लहान मुलांच्या कुस्त्या होतात. त्यानंतर सर्व भाविक गावाच्या वेशीवर येऊन दोन गटात विभागून दगडं मारतात. यानंतर ते दोन्ही गट जगदंबा मंदिराच्या दिशेने मार्गस्थ होतात. एक गट मंदिराच्या गाभाºयावर तर दुसरा गट मंदिराच्या पायथ्याशी उभा असतो. पुजारी मंदिरात पोहोचून खेळास परवानगी देताच दोन्ही गटांमध्ये तुफान दगडफेक सुरु होते. या दोन्ही गटामध्ये अंतर फक्त १५० ते २०० फूट असते. साधारण हा सामना २० मिनिटे चालतो. खेळ बंदचा इशारा होताच दोन्हीही गट दगडं मारण्याचं बंद करुन मंदिरात दर्शन घेण्यासाठी रांगा लावतात. या खेळामध्ये भाविकांना मोठ्या प्रमाणात दगडं लागतात.
यामध्ये लहानापासून वृद्धापर्यंत भाविक सहभागी होता. दगड लागून जखमे झाले तरी दवाखान्यात उपचार घेतले जात नाही. त्या जखमेवर देवीचा अंगारा लावल्यास ती जखम बरी होत असल्याची भाविकांची भावना आहे. यात सहभागी झालेले गट राजकीय नसतात. रोष, शत्रुत्व, द्वेष मनात न ठेवता दगडाची एकमेकांवर उधळण केली जाते. मंदिराच्या पायथ्याशी थांबलेल्या गटाची दगडं फक्त धुलिवंदन दिवशी वर दुसºया गटापर्यंत पोहोचतात, अशी आख्यायिका आहे.
-----------------
पाच-सहा वर्षांपासून दगडं मारण्याचा खेळ खेळतो. यापूर्वीही मला दगड लागले आहेत. आजही डोक्याला मोठी जखम झाली आहे. मात्र यावर इलाज करण्यासाठी मी दवाखान्यात कधीच जात नाही. देवीचा आठवडाभर अंगारा लावल्यास व देवीचे नियम पाळल्यास जखम बरी होते. 
-लक्ष्मण शिंदे, जखमी युवक
------------------
देवीचा इतिहास
मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागातील भोयरे गाव जगदंबादेवीच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. उंच डोंगरावर हेमाडपंथी श्री जगदंबादेवीचे प्राचीन मंदिर असून, ही देवी तुळजापूरच्या तुळजाभवानीची लाडकी बहीण असल्याचे मानले जाते. 
---------------
यांना दगडं लागली 
- लक्ष्मण शिंदे, दिनेश सिरसट, स्वप्निल चव्हाण, दत्तराज पवार, दिनेश सिरसट, विशाल साठे, लक्ष्मण लोहार, नाना पवार, अविनाश थोरबोले, धनंजय साठे या भाविकांना दगडं लागली.

Web Title: Bhoyare Rang Rangoli game, Jagdamba Devi ki Mahi: The ancient tradition of the game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.