भोयरेच्या नागेश जाधवचे यूपीएससी परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:21 AM2021-02-12T04:21:06+5:302021-02-12T04:21:06+5:30
कमांडट (ग्रुप-ए) परीक्षेमध्ये भोयरे ता. मोहोळ येथील नागेश गौतम जाधव याने देशात २०३ अशी रँक मिळवत यश संपादन ...
कमांडट (ग्रुप-ए) परीक्षेमध्ये भोयरे ता. मोहोळ येथील नागेश गौतम जाधव याने देशात २०३ अशी रँक मिळवत यश संपादन केले.
नागेशने राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी राजाराम नगर इस्लामपूर सांगली येथे इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण करीत लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास हा दिल्ली येथे केला.
यशामागील रहस्य सांगताना नागेश म्हणाला, पदवी शिक्षण घेताना घरात दोन बहिणी आणि माझ्या शिक्षणाचा एकत्रित भार सहन होत नव्हता. त्यातच अभ्यासासाठी दिल्ली व पुण्यामध्ये राहणे हा खर्चही न झेपणारा. वडिलांनी मूकबधिर मुलांच्या शाळेवर शिपाई ही नोकरी करून तसेच शैक्षणिक कर्ज घेऊन अत्यंत हलाखीतून शिक्षण पूर्ण केले. २०१६ ते २०२० असे सलग ४ वर्ष अभ्यास करत असताना यश न मिळाल्याने मानसिक तणावात होतो, मात्र आई -वडील, कुटुंब व मित्रांच्या साहाय्याने मी लहानपणापासून उराशी बाळगलेले हे स्वप्न सत्यात उतरविण्यात यशस्वी झाल्याची भावना त्याने व्यक्त केली.
स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद
कुटुंबाच्या डोळ्यातील आनंदाश्रू हे आपण मिळवलेले यश किती मोठे आहे हे सांगून जातात. यातून समाजाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता, पेशन्स ठेवून, वेळेचा अपव्यय न करता आपले ध्येय गाठणे गरजेचे असल्याचे नागेश जाधव यांनी सांगितले.
फोटो
११नागेश जाधव