मराठा आरक्षणासाठी भोयरेकरांचे नदीत अर्धा तास जलसमाधी आंदोलन

By काशिनाथ वाघमारे | Published: September 12, 2023 03:54 PM2023-09-12T15:54:58+5:302023-09-12T15:55:32+5:30

येत्या चार दिवसांमध्ये मराठा आरक्षण संदर्भात योग्य तो निर्णय नाही केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या जलसमाधी आंदोलन वेळी दिला

Bhoyrekar's half-hour water burial protest in the river for Maratha reservation | मराठा आरक्षणासाठी भोयरेकरांचे नदीत अर्धा तास जलसमाधी आंदोलन

मराठा आरक्षणासाठी भोयरेकरांचे नदीत अर्धा तास जलसमाधी आंदोलन

googlenewsNext

सोलापूर/ मोहोळ - मागील १५ दिवसांपासून मनोज जरंगे पाटील हे अंतरवाली सराटी  येथे सरकारच्या विरोधात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देत आहेत. आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी भोगावती नदीकाठी बंधाऱ्यालगत भोयरे गावासह मोहोळ तालुक्यातील असंख्य मराठा बांधव व व शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले.

येत्या चार दिवसांमध्ये मराठा आरक्षण संदर्भात योग्य तो निर्णय नाही केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या जलसमाधी आंदोलन वेळी दिला. या आंदोलनामध्ये मोहोळ तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पाण्यामध्ये उभारून छत्रपती शिवाजी महाराज की जय.. छत्रपती संभाजी महाराज की जय.. एक मराठा लाख मराठा.. अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडले.
यावेळी सरपंच बालाजी साठे, पंडित ढवण, गोविंद पाटील, दिलीप मोटे, महेश पवार, संतोष गायकवाड, प्रमोद डोके, नागेश साठे, बाळासाहेब पाटील, आबासाहेब धावणे, हणमत धावणे, ब्रम्हदेव फ़ंड, राजकुमार पाटील, भगवान थिटे, सतीश पाटील, सुधीर कोळेकर, करण सांगळे, रुद्र साठे, रामा गडदे, दादा फ़ंड, सोमनाथ पवार, विजय गायकवाड, भूपेश साठे यांच्यासह मोहोळ तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Bhoyrekar's half-hour water burial protest in the river for Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.