सांगोल्यात ६३ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:26 AM2021-08-14T04:26:47+5:302021-08-14T04:26:47+5:30
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत संजय काटे घराच्या पाठीमागील प्लॉटमधून ४० फुटी रस्त्यास जोडणारा रस्ता ...
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत संजय काटे घराच्या पाठीमागील प्लॉटमधून ४० फुटी रस्त्यास जोडणारा रस्ता व गटार, रेल्वेलाइन पूर्व बाजूच्या घराकडे जाणारा बोळरस्ता काँक्रिट, रेल्वेलाइन पूर्व बाजू रस्ता ते गाडे यांच्या घरामागून जाणारा रस्ता व गटार, जगधने घर ते वाघमारे घर रस्ता खडीकरण व डांबरीकरण आदी विकासकामांचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष मारुती बनकर, उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर, बांधकाम सभापती अप्सरा ठोकळे, आरोग्य सभापती रफिक तांबोळी, गटनेते आनंदा माने, सोमनाथ लोखंडे, चेतनसिंह केदार, जुबेर मुजावर, अस्मिर तांबोळी, नगरसेविका छाया मेटकरी, राजू मगर, रमेश जाधव, रविप्रकाश साबळे, बाबा वाघमारे, प्रशांत कांबळे, बाळासाहेब आसबे, अमोल लऊळकर, मोहन वाघमारे आदी उपस्थित होते.
.........
फोटो : सांगोला येथे विकासकामांचे भूमिपूजन करताना नगराध्यक्ष राणी माने, उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर, मारुती बनकर, आनंदा माने, सोमनाथ लोखंडे, चेतनसिंह केदार आदी.
.....फोटो १३ सांगोला १