बोरेगाव येथे विकासकामांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:27 AM2021-09-15T04:27:02+5:302021-09-15T04:27:02+5:30

बऱ्हाणपूर : अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विविध विकास ...

Bhumi Pujan of development works at Boregaon | बोरेगाव येथे विकासकामांचे भूमिपूजन

बोरेगाव येथे विकासकामांचे भूमिपूजन

Next

बऱ्हाणपूर : अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विविध विकास सोसायटीचे चेअरमन सिद्रामप्पा खेड होते.

यावेळी शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या दलित वस्ती रस्ता, सोलापूर रोड ते चंद्रकांत गाडवे घरापर्यंत जनसुविधा अंतर्गत सिमेंट रस्ता बांधणे या विकासकामांचे भूमिपूजन झाले. तसेच महाळिंगराया सभामंडप आणि नाला खोलीकरण व सरळीकरण कामांचे लोकार्पण झाले.

यावेळी आमदार कल्याणशेट्टी यांनी सरपंच उमाकांत गाडवे यांच्या कार्याचे काैतुक केले. यावेळी सरपंच उमाकांत गाडवे यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मदतीने आगामी काळात शासकीय योजनेतून आणखी निधी आणणार असल्याचे सांगितले. शिवानंद चिकलंडे, प्रा. एस. आर. जडगे यांचेही भाषणे झाली. प्रा. एस. आर. जडगे यांना साने गुरुजी कथामालेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि नीलकंठ ककमारे यांनी महाळिंगराया मंदिरासाठी मोफत जमीन दिल्याबद्दल दोघांचा आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते सत्कार झाला. कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस महादेव पाटील, उपसरपंच संगीता औरसंगे, बसवराज बाणेगाव, बांधकाम विभाग अभियंता व्ही. व्ही. पवार, सरपंच नितीन धबडे, मल्लिनाथ व्हनमुर्गे, सरपंच चिदानंद माळगे, दर्गनहळळी सरपंच संजय कोळी, ग्रामसेवक नागनाथ सोरेगाव, नागनाथ शेणकुडे, श्रीशैल स्वामी, लगमण्णा शेंडगे, बसवराज जडगे, कल्पेश उत्सुरगे, तलाठी विजय पवार, धानप्पा दहिटणे, नाना नदाफ, नेताजी पांढरे उपस्थित होते.

---

फोटो : १४ बाेरेगाव

बोरेगाव येथे विविध विकासकामांचे उद्घाटन करताना आमदार सचिन कल्याणशेट्टी.

Web Title: Bhumi Pujan of development works at Boregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.