महात्मा गांधी उद्यानातील रॉक गार्डनचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:22 AM2021-01-03T04:22:43+5:302021-01-03T04:22:43+5:30
नगरपरिषदेच्या टिळक चौकातील महात्मा गांधी उद्यान येथे रॉक गार्डन विकासकामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष ॲड. आसिफ ...
नगरपरिषदेच्या टिळक चौकातील महात्मा गांधी उद्यान येथे रॉक गार्डन विकासकामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष ॲड. आसिफ तांबोळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, रावसाहेब मनगिरे, नगरसेवक अमोल चव्हाण, नवनाथ चांदणे, श्रीधर कांबळे, किरण तौर उपस्थित होते.
राऊत म्हणाले, परिसरातील पूर्णत्वात आलेली व्यापारी संकुल, प्रगतीपथावरील गणेश तलाव सुशोभिकरण, भरावावरील सिमेंट रस्ता, सुलभ शौचालयाच्या वापरामुळे परिसरातील स्वच्छता यातून चांगले स्वरूप प्राप्त होत आहे. लवकरच तलावात पहिल्या टप्प्यात दोन बोटी व त्यानंतर पाचपर्यंत बोटी सुरू होतील. परिसरातील नागरिकांना राेजगाराच्या संधी उपलब्ध केल्याने समाधानाचे वातावरण असून लवकरच कोरोनाच्या कारणावरून बंद झालेल्या बार्शी टेक्सटाईल मिल सुरू होईल. त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. परिसरातील जीर्ण झालेल्या १७ नंबर शाळेच्या इमारतीच्या दुरूस्तीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो
०२बार्शी भूमिपूजन
ओळी
बार्शीतील महात्मा गांधी उद्यानातील रॉक गार्डनच्या भूमिपूजन प्रसंगी आ. राजेंद्र राऊत. त्याप्रसंगी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, अमिता दगडे-पाटील व अन्य.