सांगोला तालुक्यातील विविध गावांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:27 AM2021-09-07T04:27:42+5:302021-09-07T04:27:42+5:30
सांगोला तालुक्यातील विविध गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची झालेली दुरवस्था व प्रमुख रस्त्यांचे नूतनीकरण, डांबरीकरण करण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी ...
सांगोला तालुक्यातील विविध गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची झालेली दुरवस्था व प्रमुख रस्त्यांचे नूतनीकरण, डांबरीकरण करण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. या वेळी शिरभावी-मेथवडे रस्त्यावरील मिरज-पंढरपूर रेल्वे क्रॉसिंग गेट नं. २७ येथील दुतर्फा काँक्रीटकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनही केले. या प्रसंगी रेल्वेचे अभियंता मिणा हजर होते.
या वेळी प्रा. पी.सी. झपके, शिवसेना नेते भाऊसाहेब रूपनर, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, किसान आर्मीचे अध्यक्ष प्रफुल्ल कदम, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, पं.स. सदस्य सुभाष इंगोले, राजेंद्र मेटकरी, सदस्या रूपाली लवटे, वंदना गायकवाड, तालुका प्रमुख सूर्यकांत घाडगे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील भोरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी पाटील, शहर प्रमुख कमरुद्दीन खतीब, अशोक शिंदे, तोहीद मुल्ला, प्रा. संजय देशमुख, शहाजीराव नलवडे आदी उपस्थित होते.
फोटो ओळ ::::::::::::::
सांगोला तालुका हद्दीतील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करताना आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील व अन्य.