मंदिराच्या नूतनीकरणासह विठ्ठलाच्या सभा मंडप सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 01:12 PM2021-02-25T13:12:10+5:302021-02-25T13:12:15+5:30
पंढरपूर; १ कोटी २८ लाख रूपयांचा होणार खर्च, सहअध्यक्ष ह.भ.प. गहीनीनाथ महाराज यांची माहिती
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या परिवार देवताच्या ५ मंदिरासह विठ्ठलाच्या सभा मंडपाच्या सुशोभीकरणाच्या कामचे भूमिपूजन करण्यात आले. या विकास कामासाठी १ कोटी २८ लाख रूपयांचा खर्च करण्यात येणार असल्याचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सहअध्यक्ष ह.भ.प. गहीनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
विठ्ठलाच्या परिवार देवतांमधील रिद्धी सिद्धी मंदिर, लक्ष्मण पाटील देवस्थान, आंबाबाई मंदिर, रोकडोबा मारुती मंदिर, सोमेश्वर महादेव मंदिराच्या नूतनीकारण व सभा मंडपाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन सोहळा झाला. त्याचबरोबर मंदिरामध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापक यांच्या कार्यालयाचे देखील उद्घाटन करण्यात आले.
यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सहाय्यक अध्यक्ष ह.भ.प. गहीनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवार, सदस्य संभाजी शिंदे, हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर देशमुख, शकुंतला नडगिरे, साधना भोसले यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.