मोठी बातमी; पेट्रोलने भरलेले ५० लिटरचे ११ प्लास्टिक कॅन पुरवठा विभागाने पकडले
By Appasaheb.patil | Published: August 30, 2022 05:04 PM2022-08-30T17:04:22+5:302022-08-30T17:04:37+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सोलापूर : परवानगी नसताना प्लास्टिक बॅरेलमध्ये भरलेले पेट्रोल विक्री करण्यासाठी ठेवलेले असताना पुरवठा विभागाने पकडले. याप्रकरणी सहा जणांविरोधात सोलापूर तालुका पेालीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभाकर मधुकर घायाळ (वय ३७, रा. पुरवठा निरीक्षक, उत्तर सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विकास विनायक साठे (रा. पाकणी, ता. उ. सोलापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवार, २९ ऑगस्ट २०२२ रोजी विकास साठे हे आपल्या साथीदाराबरोबर चोरी करून अवैधरीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदा विनापरवाना शासकीय वितरण व्यवस्थेतील ११ प्लास्टिक कॅन प्रत्येक कॅनमध्ये ५० याप्रमाणे ५५० लिटर पेट्रोल पुरवठा विभागाने जप्त केले. याप्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास एपीआय खुणे करीत आहेत.
मागील काही दिवसांपासून सोलापूर ते पुणे महामार्गावरील पाकणी हद्दीत बेकायदेशीरपणे विक्री होणारे पेट्रोल, डिझेलच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनेक वेळा पेालिसांनी धाड टाकून संबंधितांवर कारवाई केली आहे.