मोठी बातमी; ७ फेब्रुवारीपर्यंत सोलापुरातून धावणाऱ्या १२ एक्सप्रेस गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 05:26 PM2022-02-03T17:26:46+5:302022-02-03T17:26:49+5:30

रेल्वेने घेतला ७२ तासांचा ब्लॉक; दोन गाड्यांच्या मार्गात केला बदल

Big news; 12 express trains plying from Solapur till February 7 canceled | मोठी बातमी; ७ फेब्रुवारीपर्यंत सोलापुरातून धावणाऱ्या १२ एक्सप्रेस गाड्या रद्द

मोठी बातमी; ७ फेब्रुवारीपर्यंत सोलापुरातून धावणाऱ्या १२ एक्सप्रेस गाड्या रद्द

googlenewsNext

सोलापूर : मुंबई विभागात ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकमुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या गदग, सिकंदराबाद, दादर, साईनगरसह अन्य ८ गाड्या ५ ते ७ फेब्रुवारी, २०२२ या दोन दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत, शिवाय अन्य दोन गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

मध्य रेल्वेतील मुंबई विभागात ठाणे-दिवा दरम्यान ५ आणि ६ लाइनच्या कामाकरिता ५ फेब्रुवारी, २०२२ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ७ फेब्रुवारी २०२२च्या रात्री १२ वाजेपर्यंत (७२ तासांसाठी) ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकमुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या मेल एक्स्प्रेस गाड्या रद्द/शार्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे. याबाबतची प्रवाशांनी माहिती घेऊन प्रवास सुनिश्चित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केला आहे.

----------

रद्द करण्यात आलेल्या गाड्या...

  • - सिकंदराबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस
  • - लोकमान्य टिळक टर्मिनस-सिकंदराबाद
  • - मुंबई-गदग एक्स्प्रेस
  • - गदग-मुंबई एक्स्प्रेस
  • - दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस
  • - साईनगर शिर्डी- दादर एक्स्प्रेस
  • - दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस
  • - दादर-पंढरपूर एक्स्प्रेस
  • - पंढरपूर- दादर एक्स्प्रेस

---------

मार्गात बदल करण्यात आलेल्या गाड्या...

हैद्राबाद : मुंबई एक्स्प्रेस पुणे स्थानकापर्यंत धावणार असून, मुंबई - हैद्राबाद एक्स्प्रेस पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळेवर सुटणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. आणखी काम वाढल्यास ब्लॉक पुन्हा वाढविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

 

Web Title: Big news; 12 express trains plying from Solapur till February 7 canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.