मोठी बातमी; पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या ३० भविकांना विषबाधा
By Appasaheb.patil | Published: December 6, 2022 03:06 PM2022-12-06T15:06:34+5:302022-12-06T15:07:29+5:30
या घटनेची माहिती मिळताच नगरपालिका व जिल्हा आरोग्य विभागाची टीम सतर्क झाली आहे
पंढरपूर/सोलापूर : पंढरपूर येथे देवदर्शनासाठी आलेल्या मुंबई येथील सुमारे ३० पेक्षा अधिक नागरिकांना जेवणातून विषबाधा झाली आहे. चंद्रभागा नदीकाठच्या असणाऱ्या एका हॉटेलमध्ये हे भाविक जेवले होते. जेवणानंतर या भाविकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील काही भाविक गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच नगरपालिका व जिल्हा आरोग्य विभागाची टीम सतर्क झाली आहे. शिवाय मंदिर समितीचे पदाधिकारीही या घटनेकडे गांभीर्याने पाहत आहेत. दरम्यान, अन्न व औषध विभागाची टीमही पंढरपुरात दाखल झाली असून पोलिस नेमकं काय घडलं याबाबतचा तपास करीत आहे. पंढरपूर येथील विठ्ठल-रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक पंढरपुरात येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेऊन अनेक भाविक धन्यता मानतात. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बीड, जालना यासह अन्य भागातील लोक दररोज विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. कोणी खासगी वाहनाने प्रवास करतो तर कोणी एसटी, रेल्वेने पंढरपुरात दाखल हाेतात.