मोठी बातमी; जन्मठेप झालेल्या ५ आरोपींची उच्च न्यायालयात अपीलात निर्दोष मुक्तता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 12:27 PM2021-10-07T12:27:09+5:302021-10-07T12:27:15+5:30

सोलापूर : शिक्षक पतसंस्थेच्या सचिव पदाच्या वादातून सुपारी देवून मारेकऱ्यांमार्फत शिक्षक पतसंस्थेचे सचिव बजरंग ज्ञानोबा धावने यांचा खून केल्याप्रकरणी जन्मठेप झालेल्या ५ आरोपींची मुंबई उच्च ...

Big news; 5 convicts acquitted in appeal in High Court | मोठी बातमी; जन्मठेप झालेल्या ५ आरोपींची उच्च न्यायालयात अपीलात निर्दोष मुक्तता 

मोठी बातमी; जन्मठेप झालेल्या ५ आरोपींची उच्च न्यायालयात अपीलात निर्दोष मुक्तता 

Next

सोलापूर : शिक्षक पतसंस्थेच्या सचिव पदाच्या वादातून सुपारी देवून मारेकऱ्यांमार्फत शिक्षक पतसंस्थेचे सचिव बजरंग ज्ञानोबा धावने यांचा खून केल्याप्रकरणी जन्मठेप झालेल्या ५ आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती साधना जाधव व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने अपिलात निर्दोष मुक्तता केली.

      या प्रकरणाचे हकीकत अशी की, बजरंग जाधव रा. डिकसळ, ता. मोहोळ हे सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक पतसंस्थेमध्ये सचिव होते. सोसायटी मधील कर्मचारी पंढरीनाथ पवार, प्रशांत सावंत व गहीनीनाथ धावने हे सचिव बजरंग धावने यांना सचिवपद सोड म्हणून वारंवार त्रास देत होते व भांडण करत होते. बजरंग धावने हे पतसंस्थेच्या सचिव पदाचा राजीनामा देत नसल्यामूळे चिडून जाऊन आरोपी पंढरीनाथ पवार, प्रशांत सावंत व गहीनीनाथ धावने यांनी प्रकाश शिंदे व सोन्या उर्फ उमेश मेटकरी यांना बजरंग धावने यांच्या खुनाची सुपारी दिली. १६ फेब्रुवारी २०११ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास बजरंग धावने हे त्यांचा मुलगा स्वप्नीलसह गावाकडे जात असतांना पडसाळी व मसले चौधरी गावाच्या सरहद्दीवर प्रकाश शिंदे व सोन्या मेटकरी यांनी धारधार शस्त्रांनी बजरंग धावणे यांचा खून केला असे सरकारपक्षाचे म्हणणे होते.

प्रकाश शिंदे, सोन्या मेटकरी, पंढरीनाथ पवार, प्रशांत सावंत व गहीनीनाथ धावने यांना या प्रकरणी सोलापूरचे तत्कालीन जिल्हा न्यायाधीश आशिवीनकुमार देवरे यांनी कलम ३०२, १२० ब अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सदर शिक्षेविरुध्द सर्व आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात अपिल दाखल केलेले होते. सदर अपीलाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती साधना जाधव व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर झाली. कट केल्याबद्दलचा पुरावा व आरोपींच्या ओळखपरेड बाबतचा पुरावा विश्वासहऱ्या नसल्याने खंडपीठाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. 

या प्रकरणी उच्च न्यायालयात आरोपी पंढरीनाथ पवार व प्रशांत सावंत तर्फे ॲड.सत्यव्रत जोशी, ॲड. जयदीप माने, प्रकाश शिंदे, उमेश मेटकरीतर्फे ॲड.अनिता अग्रवाल, गहिनीनाथ धावणे तर्फे ॲड. विरेश पुरवंत यांनी तर सरकारतर्फे ॲड. गीता मुळेकर यांनी काम पाहिले.

Web Title: Big news; 5 convicts acquitted in appeal in High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.