मोठी बातमी; कुर्डूवाडीतील एटीएम फोडणाऱ्या ६ जणांना भोपाळहून पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 05:38 PM2020-12-13T17:38:36+5:302020-12-13T17:38:55+5:30

माढा न्यायालयाने आरोपींना दिली दोन दिवसांची पोलिस कोठडी

Big news; 6 arrested for burglary in Kurduwadi | मोठी बातमी; कुर्डूवाडीतील एटीएम फोडणाऱ्या ६ जणांना भोपाळहून पोलिसांनी केली अटक

मोठी बातमी; कुर्डूवाडीतील एटीएम फोडणाऱ्या ६ जणांना भोपाळहून पोलिसांनी केली अटक

Next

कुर्डुवाडी : येथील माढा रोडवरील भरवस्तीत असलेले बँक आॅफ इंडिया शाखेचे एटीएम मशीन फोडून रोखड ११ लाख ४२ हजार ५०० रुपये लंपास केल्याप्रकरणी ६ आरोपींना कुर्डुवाडी पोलिसांनी भोपाळ पोलिसांकडून ताब्यात घेतले असून त्यांना माढा न्यायालयात उभे केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

समशेर उर्फ दलशेर फजरु( वय ४० रा. गंगोरा पो.व ता.पहाडी जि.भरतपूर राज्य राजस्थान),साहाजत उर्फ शहादत उर्फ हाजर खान (वय २५, रा.पिनगुवाॅ ता.पुन्हाना जि.नूह हरियाणा), शाकिर फजरु (वय ४०, रा.गंगोरा पो.व ता.पहाडी जि.भरतपूर राज्य राजस्थान ),आसमोहम्मद फजरुद्दीन (वय ३४ रा, नांगली पठाण पो.लंगडवास ता.किशनगढ जि.अलवर राजस्थान),मसी उल्लाह अख्तर (वय २१, रा.रामपूरी ता. नूह मेवात राज्य हरियाणा), मुशरीफ खान शरीफ कमरुद्दीन खान (वय २७, रा सरस्वास ता. पराणा जि.नूह हरियाणा )अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

 याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माहिती २४ नोव्हेंबर रोजी रात्री.१२ ते पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान येथील माढा रोडवरील बँक आॅफ इंडिया कुर्डुवाडी शाखेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यामधील ११ लाख ४२ हजार ५०० रुपये चोरून चोरट्यांनी पलायन केले  होते. दरम्यान भोपाळ येथील परवलिया पोलिस स्टेशनच्या हद्दीत अशाच प्रकारे चोरी करण्याच्या तयारीत असणाऱ्या सहा जणांना भोपाळ पोलिसांनी मध्यरात्री गस्त घालताना पकडले होते.  त्यावेळी या सहाही आरोपींनी तपासात दिलेल्या जबाबात सोलापुर जिल्ह्यातील विविध एटीएम मशीन मध्ये चोरी केल्याचे समोर आले होते.

त्यानुसार कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे,पोलीस शिपाई दत्ता सोमवाड,राहूल रिकिबे,सागर गवळी,दाढे,पठाण या पथकाने ट्रान्सफर वारंटद्वारे सदर संशयीत आरोपींना भोपाळ येथून ताब्यात घेऊन रविवारी माढा न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे . याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे हे करीत आहेत.

Web Title: Big news; 6 arrested for burglary in Kurduwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.