मोठी बातमी; मराठा आरक्षणासाठी आज पंढरपुरातून मुंबईच्या दिशेने निघणार आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 10:50 AM2020-11-07T10:50:03+5:302020-11-07T10:50:03+5:30

पंढरपुरात ६०० पोलिसांचा बंदोबस्त; समाजाच्या मागण्यांसाठी मराठा समाज आक्रमक

Big news; Aakrosh Morcha will leave Pandharpur for Mumbai today for Maratha reservation | मोठी बातमी; मराठा आरक्षणासाठी आज पंढरपुरातून मुंबईच्या दिशेने निघणार आक्रोश मोर्चा

मोठी बातमी; मराठा आरक्षणासाठी आज पंढरपुरातून मुंबईच्या दिशेने निघणार आक्रोश मोर्चा

Next
सोलापूर ; : मराठा आरक्षण व इतर न्याय मागण्यांसाठी आज मराठा संघटना च्या वतीने श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन सकाळी १२ वाजता मोर्चा मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे, दरम्यान शुक्रवारी रात्री १२ वाजता मंदिर परिसरात संचारबंदी लागू करून कार्यकर्ते यांना पंढरपूर येथे येण्यास मज्जाव करण्यात येत आहे. बंदोबस्ताकरिता ६०० पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मराठा आंदोलकांची एक प्रकारे मुस्कट दाबी करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलनकर्ते करत आहेत. मराठा समाज आरक्षण व इतर मागण्यांसाठी आक्रमक झाला असून आज शनिवारी सकाळी १२ वाजता नामदेव पायरी येथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन पायी दिंडी आक्रोश मोर्चा पंढरपूर येथून मार्गस्थ होणार आहे, याकरिता मोजक्या कार्यकर्त्यांना नामदेव पायरी येथे दर्शन करण्यास सोडावे अशी मागणी करण्यात आली आहे, मात्र अद्याप प्रशासनाने याबाबत निर्णय दिलेला नाही.  मोर्चा मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. याकरिता शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, डी वाय एस पी विक्रम कदम यांच्याबरोबर मराठा समन्वयकाची बैठक निष्फल ठरली. त्यामुळे मराठा आंदोलक मोर्चा काढण्यावर ठाम आहेत.
या मोरच्यांची दखल घेऊन प्रशासनाने ६०० पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच राज्य राखीव दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामुळे पंढरपूर येथे मोर्चेकरणा येण्यास मज्जाव करीत आहेत, सध्या पंढरपूर येथे 15 मराठा आरक्षण आंदोलन समन्वयक उपस्थित आहेत. या आंदोलनाकडे सर्व राज्याचं लक्ष लागले आहे.

असा आहे पोलिस बंदोबस्त....
५ उपविभागीय पोलीस अधिकारी, १४ पोलीस निरीक्षक, ३१ सपोनि- पोलिस उपनिरीक्षक, ४१५ पोलीस कर्मचारी, २९ वाहतूक अंमलदार, दंगा काबू पथक, एस आर पी एफ ची तुकडी असा बंदोबस्त असणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.

Web Title: Big news; Aakrosh Morcha will leave Pandharpur for Mumbai today for Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.