मोठी बातमी; अर्धनग्न अवस्थेत डान्स चालणाऱ्या सोलापुरातील ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 05:31 PM2021-06-12T17:31:18+5:302021-06-12T17:31:24+5:30
आठ नृत्यांगना, २९ इसमांना अटक; ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर : चित्रपटातील गाण्यावर अश्लील पद्धतीने डान्स सुरू असतानाच गुरुवारी मध्यरात्री बाळे परिसरातील हॉटेल पॅराडाइजवर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला. यावेळी अश्लील व बीभत्स नृत्य करणाऱ्या ८ नृत्यांगना व त्यांच्यावर पैसे उधळणाऱ्या २९ इसमांना ताब्यात घेतले. जवळपास तीन तास सुरू असलेल्या कारवाईत ४९ लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
चित्रपटाच्या गाण्यातील तालावर मद्यधुंद अवस्थेत नाचत मद्याचा घोट घेत असताना पोलिसांनी अचानकच छापा टाकला. यामुळे अनेक आंबटशौकिनांची नशा तिथेच उतरली. काही आंबटशौकिन बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागले. पोलिसांनी सर्वांना तंबी देत एकाच ठिकाणी थांबण्यास सांगून त्यांच्यावर कारवाई केली. दरम्यान, हॉटेल पॅराडाइजमधील स्टेजवर आठ महिला अश्लील हावभाव करत नृत्य करत होत्या. तसेच काहीजण त्यांच्या अंगावर चलनी नोटा उडवून त्यांच्या अंगाला स्पर्श करत होते. यामुळे पोलिसांनी सर्व पुरुष व महिलांना ताब्यात घेतले. या छाप्यात ४८ लाख ९८ हजार ३३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, पोलिसांनी हॉटेल पॅराडाइजचा मालक बाबा जाफर पठाण हा त्याचे हस्तक संजय पोळ व मॅनेजर मुकेशसिंग बायस यांच्याकरवी हॉटेल पॅराडाइज ऑर्केस्ट्रा बार चालवत होता. त्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलीस निरीक्षक निखिल पवार, संदीप शिंदे, फौजदार शैलेश खेडकर, सहायक फौजदार सुहास आखाडे, पोलीस हवालदार औदुंबर आटोळे, अजय पाडवे, दीपक किर्दक, पोलीस नाईक राजेश चव्हाण, संतोष फुटाणे, राकेश पाटील, विनायक बर्डे, सागर गुंड, सिद्धाराम देशमुख, कुमार शेळके, सोमनाथ सुरवसे, कृष्णात कोळी, सचिन बाबर, संतोष माने, स्वप्नील कसगावडे, राजू मुद्गल, प्रवीण मोरे, नीलेश शिरूर, दत्तात्रेय कोळेकर, विद्यासागर मोहिते, नेताजी गुंड, रंजीतसिंग परिहार, विजय निंबाळकर, महिला पोलीस शिपाई आरती यादव, आर.व्ही. सोनवणे, नारंगकर, इमडे, शेरखाने यांनी पार पाडली.
-
इन्फो बॉक्स
यांच्यावर गुन्हा दाखल
याप्रकरणी संजय पोळ (वय ४१), मुकेशसिंग बायस (वय ४७), अजिंक्य अशोक देशमुख (वय ३०), मयूर लक्ष्मण पवार (वय ३५), विजय शिवशंकर तिवारी (वय ४७), विशाल राजेंद्र कोळी (वय २६), नितीन अप्पासाहेब सासणे (वय ३४), गोपाळ बाबू जाधव (वय ४८), सुधाकर संदीपान माने (वय २७), श्रीकांत प्रल्हाद शिंदे (वय २२), आकाश गणेश कांबळे (वय २७), मारुती केत (वय ३७), रजनीश भोसले (वय ३४), सचिन सुरेश जाधव (वय ३५), अमर देविदास जमादार (वय २७), आकाश गुरव, दीपक सुंदरसिंग चव्हाण, प्रकाश वाघमारे, पुरुषोत्तम बने, अमिताभ वाघमारे, अजय शिवाजी धजाल, प्रसाद लोंढे, प्रवीणकुमार शिंदे, प्रशांत गायकवाड, प्रभाकर फताटे, राजकुमार उडचान, निसार मुजावर, संतोष कदम, गौस शेख व ८ नर्तिका यांच्याविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.