मोठी बातमी; अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्याध्यापक अन् केंद्रप्रमुख बनले ग्रामपंचायतीचे कारभारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 10:12 PM2020-11-05T22:12:13+5:302020-11-05T22:12:50+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सोलापूर: जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८ ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून अंगणवाडी पर्यवेक्षिका, जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांसह कृषी अधिकारी व विस्तार अधिकाºयांना नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी गुरूवारी सायंकाळी ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचे आदेश काढले. याबाबत ग्रामपंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी अहवाल सादर केला होता. ज्या दिवशी ग्रामपंचायतीची मुदत संपेल त्या दिवशी या प्रशासकांनी कारभार हाती घेण्याबात सूचित करण्यात आले आहे. या प्रशासकांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील तरतुदीनुसार सरपंच पदाचे अधिकार व कर्तव्ये पार पाडता येणार आहेत.
ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊन नवीन सरपंच निवड होईपर्यंत हे प्रशासक संबंधीत ग्रामपंचायतीचे कारभारी राहणार आहेत.
जुलैमध्ये ४, आॅगस्टमध्ये १२३ आॅक्टोबरमध्ये ६, नोव्हेंबरअखेर ५१९ आणि डिसेंबरअखेर ६ ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे. जुलै ते डिसेंबरअखेर मुदत संपणाºया ग्रामपंचायतीची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे. करमाळा:५१, माढा: ८२, बार्शी: ९६, उत्तर सोलापूर:२४, मोहोळ: ७६, पंढरपूर:७२, माळशिरसम ४९, सांगोला: ६१, मंगळवेढा:२३, दक्षिण सोलापूर: ५२, अक्कलकोट: ७२.