मोठी बातमी; सोलापुरातील नादुरुस्त दवाखान्यासाठी पावणे चार कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 08:29 PM2021-04-25T20:29:07+5:302021-04-25T20:29:55+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Big news; Approval of Rs | मोठी बातमी; सोलापुरातील नादुरुस्त दवाखान्यासाठी पावणे चार कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

मोठी बातमी; सोलापुरातील नादुरुस्त दवाखान्यासाठी पावणे चार कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

googlenewsNext

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. शहरांमध्ये ऑक्सिजन बेड व इतर बेडची कमतरता भासू नये, यासाठी शहरातील सोलापूर महानगरपालिकेच्या नादुरुस्त दवाखाने दुरुस्तीसाठी पावणेचार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या दवाखान्यामुळे २५० बेडची सोय होणार आहे.

नियोजन भवन येथे उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि सोलापूर शहरातील कोविड-19 संबंधित उपाययोजनेबाबत आढावा बैठकीत भरणे बोलत होते. यावेळी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, यशवंत माने, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह सभापती, गटनेते, सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

भरणे म्हणाले, सोलापूर शहरात ग्रामीण भागासह शेजारील जिल्ह्यासह कर्नाटकमधून कोरोनाचे रूग्ण उपचारासाठी येत आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने आणि मनपाने योग्य नियोजन करणे महत्वाचे आहे. शहरातील महापालिकेचे बंद अवस्थेत असलेले दवाखाने दुरूस्ती करून त्याठिकाणी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शहरात मनपा आयुक्तांनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सामाजिक कामातून कोविड केअर सेंटर कोणी उभे करीत असतील तर त्यांना त्वरित मंजुरी द्यावी.

लोकसंख्येच्या प्रमाणात शहरात कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ हॉस्पिटल, ऑक्सिजन बेडची उपलब्धता, व्हेंटिलेटर याची तयारी प्रशासनाने त्वरित करावी. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून गरीब रूग्णांवर उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. खाजगी रूग्णालये जादा बिलाची आकारणी करीत असतील तर पथकाद्वारे तपासणी करा. दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा. कोरोना पेशंटच्या नातेवाईकांना जेवणाची सोय त्वरित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

 रेमडेसिविर इंजेक्शन दिलेल्या रूग्णांची नोंद ठेवा
रेमडेसिविर इंजेक्शन गरज असेल त्याच रूग्णांना द्यावे, रूग्ण गंभीर नसेल तर नातेवाईकांनी उगाच इंजेक्शनचा आग्रह धरू नये. डॉक्टरांनी सरसकट सर्वांना रेमडेसिविर इंजेक्शन न देता गरजूंना द्यावे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला जादा इंजेक्शन देण्याचे मान्य केले असून 30 एप्रिलपर्यंत तुटवडा कमी होईल. इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी रूग्णालयांनी इंजेक्शन दिलेल्या रूग्णांची नावे नोंदवहीत ठेवण्याचे निर्देशही भरणे यांनी दिले.

Web Title: Big news; Approval of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.