मोठी बातमी; सोलापुरातील उच्चभ्रू वस्तीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या आन्टीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 12:09 PM2021-12-18T12:09:29+5:302021-12-18T12:09:35+5:30

दोन मुलींची सुटका: सोशल मीडियामधून चालवत होती व्यवसाय

Big news; Aunty arrested for prostitution in Solapur | मोठी बातमी; सोलापुरातील उच्चभ्रू वस्तीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या आन्टीला अटक

मोठी बातमी; सोलापुरातील उच्चभ्रू वस्तीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या आन्टीला अटक

googlenewsNext

सोलापूर : उच्चभ्रू वस्तीत राहून ग्राहकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांचे फोटो पाठवून वेश्या व्यवसाय करणाऱ्या आन्टीला पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने अटक केली. सुप्रिया बालीका (वय ५३, रा. जुळे सोलापूर) असे आन्टीचे नाव आहे. तिच्या तावडीतून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.

सुप्रिया ही मागील अनेक वर्षांपासून परराज्यातून महिलांना बोलून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हापासून पोलीस तिच्या मागावर होते. पण ती काही महिन्यानंतर मोबाईल नंबर बदलत असल्यामुळे पोलिसांच्या तावडीतून ती सुटत होती. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे सपोनि इंद्रजीत वर्धन यांना जुळे सोलापुरातील वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी तात्काळ पंच बोलून पंचांसमक्ष धाड टाकली. यात सुप्रिया बागल हिला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सपोनि इंद्रजित वर्धन, पीएसआय गंपले, वाघ, अफरोज शेख, सुभाष गायकवाड, डिगोळे आदींनी केली.

 

एका तासासाठी दीड हजार

सुप्रिया ही एका ग्राहकांच्या मोबाईलवर महिलांचे फोटो आणि रेट पाठवत होती. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी बनावट ग्राहक तिच्याकडे पाठवले. बनावट ग्राहकाने तिला दीड हजार रुपये दिल्यानंतर तिने ग्राहकांसोबत एका महिलेला पाठवून दिले. त्यानंतर पोलिसांनी धाड घालत सुप्रिया हिच्यावर कारवाई केली. दरम्यान, तिच्या तावडीत असलेल्या मुंबई आणि सोलापूरच्या महिलेची सुटका करण्यात आली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Web Title: Big news; Aunty arrested for prostitution in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.