मोठी बातमी; कोरोना लसीचा साठा आज संपणार; १ लाख डोसची केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 12:52 PM2021-04-06T12:52:10+5:302021-04-06T12:52:16+5:30

९२०३ जणांनी घेतला डोस : १ लाख डोसची केली मागणी

Big news; Corona vaccine stocks to run out today; Demand for 1 lakh doses | मोठी बातमी; कोरोना लसीचा साठा आज संपणार; १ लाख डोसची केली मागणी

मोठी बातमी; कोरोना लसीचा साठा आज संपणार; १ लाख डोसची केली मागणी

googlenewsNext

सोलापूर : आरोग्य विभागातर्फे घेण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत सोमवारी ९ हजार २०३ जणांनी डोस घेतला. आरोग्य विभागाकडे मंगळवारी लसीकरणाला पुरेल इतकाच साठा आता उरला आहे.

आरोग्य विभागातर्फे सोमवारी घेण्यात आलेल्या लसीकरणात ४५ वर्षांवरील ४ हजार ५६९ तर साठ वर्षांवरील ३ हजार ७०६ व्यक्तींनी पहिला डोस घेतला. त्याचप्रमाणे ३३ आरोग्य तर ४२१ फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांनीही पहिला डोस घेतला आहे. तसेच १०८ आरोग्य, १०० फ्रन्टलाइन १२१ जण, ४५ वर्षांवरील आणि १३५ ज्येष्ठ व्यक्ती अशा ४६४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. अशाप्रकारे सोमवारी ९ हजार २०३ जणांनी लस घेतली आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणात आतापर्यंत १ लाख ६१ हजार २८१ जणांना डोस देण्यात आला आहे. त्यामध्ये ३४ हजार ८४३ आरोग्य, २७ हजार ४८२ फ्रन्टलाइन, ३१ हजार ६१४ व्यक्ती ४५ वर्षांवरील आणि ६७ हजार ३४२ ज्येष्ठ व्यक्तींनी पहिला डोस घेतला आहे. तसेच १९ हजार ७३२ आरोग्य, ७ हजार २३ फ्रन्टलाइन, ४५ वर्षांवरील ३७९, साठ वर्षांवरील ४७५ अशा २७ हजार ६०९ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

एक लाख डोसची मागणी

जिल्हा आरोग्य विभागाकडे शासनाकडून आलेले केवळ दहा हजार डोस शिल्लक आहेत. मंगळवारी लसीकरण झाल्यानंतर साठा संपणार आहे. शासनाकडे एक लाख डोसची मागणी केल्याचे समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी सांगितले. मंगळवारी रात्री डोसचा साठा न आल्यास बुधवारी लसीकरण सत्र खंडित होणार आहे.

 

आज झालेले लसीकरण

  • पहिला डोस ८७२९
  • दुसरा डोस ४६४
  • एकूण ९२०३

Web Title: Big news; Corona vaccine stocks to run out today; Demand for 1 lakh doses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.