मोठी बातमी; भालकेंच्या प्रचार सभेला गर्दी; परवानगी मागणाऱ्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 09:21 PM2021-04-04T21:21:19+5:302021-04-04T21:22:04+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
पंढरपूर : पंढरपूर राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचार शुभारंभाच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. यामुळे या कार्यक्रमासाठी परवानगी घेणारे विजयसिंह बाळासाहेब देशमुख (रा.कासेगाव, ता. पंढरपुर) यांच्या विरुध्द तालुका पोलीस ठाण्यात भादवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भगीरथ भारत भालके या उमेदवाराचे प्रतिनिधी विजयसिंह बाळासाहेब देशमुख (रा. कासेगाव, ता. पंढरपुर) यांनी रांझणी (ता. पंढरपुर) येथील शनिवारी झालेल्या प्रचार सभेस व स्पीकर लावणेसाठी पत्राद्वारे परवानगी मागणी केली होती. व्यवस्थापन यांनी नेमुन दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रचारसभेस परवानगी दिली होती. सभेच्या वेळी व्हीएसटी पथक प्रमुख अशोक वैजीनाथ नलवडे, एस.यु. नागटीळक, फोटोग्राफर अजित देशपाडे, वाहन चालक पंडीत इंगोले हे तिथे हजर होते. सुरक्षित शारीरिक अंतर ठेवण्याबाबत निर्गमित केलेल्या आदेशाचे सभेचे आयोजक यांनी उल्लघंन केल्याचे या पथकाला निदर्शनास आले. यामुळे विस्तार अधिकारी व व्हीएसटी पथक प्रमुख अशोक वैजीनाथ नलवडे यांनी विजयसिंह देशमुख यांच्याविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.