मोठी बातमी; मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावातील नुकसानीच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 08:24 AM2020-10-23T08:24:26+5:302020-10-23T08:26:20+5:30

तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक अशा  १०१ कर्मचाऱ्यांनी कंबर कसली

Big news; Damage panchnama work in 81 villages of Mangalvedha taluka on war level | मोठी बातमी; मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावातील नुकसानीच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर 

मोठी बातमी; मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावातील नुकसानीच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर 

googlenewsNext

मंगळवेढा /मल्लिकार्जुन देशमुखे 

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावातील अतिवृष्टीने व महापुराने नुकसान झालेल्या पिकाचे व पडलेल्या घराचे पंचनामे करण्याचे  काम तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक असे  १०१ कर्मचाऱ्यांवतीने  युद्धपातळीवर सुरू आहे . शेतकऱ्यांनी गावनिहाय नेमणुक केलेल्या नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार आता बाधीत क्षेत्राचे पंचनामे  करण्यासंदर्भात महसूल खात्याने तातडीने पावले उचलली असून मंगळवेढा, भोसे, मरवडे, आंधळगाव,मारापुर, बोराळे ,हुलजंती या सात महसूल मंडलसाठी हे कर्मचारी नियुक्त करण्यात आले. यामध्ये  यु व्ही सूर्यवंशी, के एस मलाबदी, सी.बी.कांबळे,जी.एम.जगताप (मंगळवेढा), सी.ए बनसोडे (माचणूर), एन.एल.कल्ले (रहाटेवाडी), एन एस काझी (तामदर्डी), व्ही.बी.केंजळे, एस.बी. शिंदे (ब्रह्मपुरी), जे.वाय.मुलाणी (बठाण), पी.पी पुजारी ए.पी घुले (उचेठाण), एम.व्ही.उबाळे(पाठखळ), बी.आर.आठराबुध्दे (गणेशवाडी), एस एच कुंभार (मेटकरवाडी) आर.आर. बेशकराव ,एन बी पाटील (डोणज), एन एम कुलकर्णी (भालेवाडी), डी एम पवार (डोंगरगाव),डी.बी. पवार (कचरेवाडी), 
एम.डी वाघमोडे, जी.जे.भागवत, जे.पी पांडे (मरवडे) बी.एस.पाटील,मंगेश लासूरकर (तळसंगी), व्ही.एन. सूर्यवंशी (खोमनाळ) बी.डी कोळी (फटेवाडी),एस.एन. फुलारी(भाळवणी) बी.बी. भोसले (हिवरगाव),ए.एस. पाटील (येड्राव),भारत चंदनशिवे (जित्ती)राहूल कांबळे(डिकसळ),खोंडे (निंबोणी),युन्नुस फुलारी, समाधान वगरे(चिक्कलगी), पी.बी. ढोबळे, एस.एस.गावडे (आंधळगाव), ए.एस.चव्हाण, जे.एन.गायकवाड (नंदेश्वर),टी. एस.सावंत(जुनोनी), आर.पी.इंगळे, डी.डी.करे (गोणेवाडी), एन,के, पवार, एम.टी भोसले (खुपसंगी), एम.पी संकपाळ (लेंडवेचिंचाळे), एम.पी.जुंदळे (हाजापूर) एस.डी.लेंडवे (शिरसी), ए.ए.लाड,(जालीहाळ), एस.बी,शेख (खडकी), पी.पी.कोळी, एम.जी.पवार (मारापूर) ए.डी. जिरापुरे (शेलेवाडी),पी.एस.भोरकडे,जी.एस नलावडे (अकोले),लोखंडे,डी.ए. इंगोले,व्हि.एच.भोई,(लक्ष्मी दहिवडी),डी.ए. स्वामी(गुंजेगाव), टी.के. कांबळे, एम एस गायकवाड(महमदाबाद शे.) वंदना गुप्ता (मल्लेवाडी), एच.एल.शिंदे (ढवळस), राखी जाधव(देगाव) एम.ओ.कवाळे(मुढवी), श्रीकांत ठेंगील (धर्मगाव), प्रशांत काटे, ए.टी.कोळेकर(हुलजंती), एस माने (माळेवाडी), पी.व्ही.भितकर (सोड्डी), आर.एस.गायकवाड (शिवणगी), ए.डी.चलावादी(येळगी), बी.बी.राठोड, गणेश गवळी(सलगर बु), आर.एल. खोमणे (सलगर खु,), बी.डी.काटे(आसबेवाडी), बी.एस. माने (बावची), एस.आर.जामगौंड(पौट),पी. एस. चव्हाण(जंगलगी), ए.बी. इंगळे घोळवे,(लवंगी),जयश्री कल्लाळे,राजकुमार ढेपे (भोसे), राजाराम रायभान,डी.जी.विरनक (शिरनांदगी), ए.एस. शिंदे, एन एच मौलवी(हुन्नुर), एम एस.गावडे, डी.टी.मुठेकर(मानेवाडी), एस.के. इनामदार (रेवेवाडी)आर.बी.चव्हाण, पी.एस. शिवशरण(रड्डे), एम.एन.फराटे(सिध्दनकेरी),डी.बी. मोरे(लोणार), ए.यु.खवसे (पडोळकरवाडी), ए.टी.लिगाडे (मारोळी), चौधरी (महमदाबाद हु), विजय शिंदे,अरूण मोरे (बोराळे) एस.आर.कडलासकर, पी.पी पाटील (मुंढेवाडी), ए.यु. मोरे (सिध्दापूर), व्ही.बी. भोजने (तांडोर), व्ही.ए.लिगाडे, एस.आर.नळे(अरळी), विजय एकतपुरे, (कागष्ट) बी.डी.भोजने(कात्राळ), विजय एकतपुरे,(कर्जाळ),व्हि.के.भोजने (लमांणतांडा), आर.डी.बागल(नंदूर)
--
रेड्डे च्या तलाठ्याकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा...

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या दरम्यान रेड्डे येथे बहुतांशी शेतकऱ्यांनी बाजरी सह जे काही थोड्या प्रमाणात वाचलेले पीक बाजूला काढण्याचा प्रयत्न केला मात्र महसूल चे काही बहाद्दर तलाठी ज्या शेतकऱ्यांनी पीक काढण्याचा प्रयत्न केला त्यांचे पंचनामे करणार नाही त्यांना नुकसान भरपाई दिली जाणार नाही असा अजब फतवा काढला आहे या  मनमानी कारभाराणे शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे.आम्ही काढलेले पीक तसेच आहे ते पंचनामा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घेऊन जावे पण आमचा पंचनामा करावा अशी विनवणी करत आहे.मात्र काही कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा  होत असून जिल्हाधिकारी यांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून कामचुकार तलाठी सह कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी रेड्डेचे शेतकरी सुनील लोखंडे यांनी केली आहे.

मंडलनिहाय पर्यवेक्षीय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी व कृषी पर्यवेक्षक यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. काहीही अडचण असल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करावा. बाधित नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत. 
 - स्वप्नील रावडे ,तहसीलदार मंगळवेढा

Web Title: Big news; Damage panchnama work in 81 villages of Mangalvedha taluka on war level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.