मोठी बातमी; सांगोला तालुक्यात रानगव्याचे दर्शन; अनेक गावात घालतोय धुडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 11:57 AM2021-12-29T11:57:11+5:302021-12-29T12:00:22+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सांगोला : आलेगाव ता. सांगोला येथील ( हजारे वस्ती ) जवळील वन विभागाच्या कार्यक्षेत्रात मागील तीन दिवसांपासून रानगवा फिरताना दिसून येत आहे. त्याला जनावरे ,प्राणी, मनुष्याचे दर्शन झाल्यानंतर तो इकडून तिकडे धावत सुटतोय. सध्या या रानगव्या पासून कोणालाही धोका नसला तरी शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होऊ शकते असा शेतकरी सांगत आहेत.
दरम्यान, सांगली शहरात काल मंगळवारी रानगव्यांने धुडगूस घातल्याची घटना ताजी असताना सांगोल्यात दुसऱ्यांदा रानगव्याच्या दर्शन झाल्यामुळे तो कोल्हापूर सांगली जिल्ह्यातून सांगोला तालुक्यात भरकटलेला असावा असे ग्रामस्थांतून बोलले जात आहे.
यापूर्वीही कमलापूर, वासुद, कडलास, डिकसळ परिसरात रानगव्यांने धुडगूस घातला होता, परत पुढे तो सांगली जिल्ह्यात गेला आता पुन्हा त्याचे सांगोला तालुक्यात आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. रानगव्याबाबत सांगोला येथील वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी माहिती घेऊन सांगतो असे समर्पक उत्तर दिले.