मोठी बातमी; सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश काळे यांचा तडीपारी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2022 07:17 PM2022-03-03T19:17:54+5:302022-03-03T19:17:59+5:30
पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी संपुष्टात आणली आहे.
सोलापूर: पोलीस आयुक्तांनी उपमहापौर राजेश काळे यांच्यावर केलेली तडीपारची कारवाई पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी संपुष्टात आणली आहे.
उपमहापौर राजेश काळे यांच्यावर पोलीस आयुक्तांनी ७ डिसेंबर रोजी सोलापूर, उस्मानाबाद जिल्हा व इंदापूर तालुक्यातून तडीपारची कारवाई केली होती. त्यांना पुणे जिल्ह्यात नेऊन सोडले होते. या कारवाईविरूद्ध काळे यांनी ॲड. दीपक पाटील यांच्यामार्फत विभागीय आयुक्तांकडे अपील केले होते.
ॲड. पाटील यांनी उपमहापौर काळे यांच्याविरूद्ध गंभीर गुन्हे दाखल नाहीत. ते समाजकार्य करतात. जे गुन्हे दाखल झाले आहेत ते पदावर येण्याआधीचे आहेत. लोक कामासाठी दाखल झालेल्या गुन्ह्यांवरून केवळ राजकीय द्वेषापोटी ही कारवाई करण्यात आली आहे असा युक्तीवाद केला. यावर म्हणणे मांडण्यासाठी पोलिसांनी वेळ मागितला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद विचारात घेऊन ३ मार्च रोजी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी निकाल दिला. यामध्ये त्यांनी पोलीस आयुक्तालयातील परिमंडळच्या उपायुक्तांनी काढलेले संपुष्टात आणले.