Earthquake in Solapur: मोठी बातमी! सोलापुरात भूकंपामुळे मोठी घबराट; लोक पडले घराबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 06:55 AM2021-09-05T06:55:23+5:302021-09-05T07:46:20+5:30
Earthquake in Solapur at night: रात्री बारा वाजण्याच्या सुमारास 'लोकमत' कार्यालयात शहरातून अनेक दूरध्वनी आले अन् भीतीच्या सुरात नागरिकांनी भूकंपसदृश धक्का जाणवल्याचे सांगितले.
सोलापूर : सोलापूर शहराला शनिवारी रात्री ११.४७ ते १२ वाजण्याच्या दरम्यान भूकंपाचा धक्का बसल्याचे वृत्त एका संकेतस्थळावरून देण्यात आले. या वृत्ताला अधिकृत भूकंपमापन यंत्रणेचा मात्र कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. शहरवासीय मात्र गूढ आवाज अन् इमारतीला कंपन जाणवल्याने घराबाहेर पडले. दरम्यान भूकंप ३.८ असल्याचेही बोलले जात आहे.
रात्री बारा वाजण्याच्या सुमारास 'लोकमत' कार्यालयात शहरातून अनेक दूरध्वनी आले अन् भीतीच्या सुरात नागरिकांनी भूकंपसदृश धक्का जाणवल्याचे सांगितले.
विजयपूरसह कर्नाटकात जाणवला धक्का
या संकेतस्थळावरून देण्यात आलेल्या वृत्तात सोलापूरसह कर्नाटकातील सिंदगी, विजयपुर, बसवणबागेवाडी या शहरामध्ये भूकंपाचा धक्का जाणवल्याचे वृत्त दिले आहे. वस्तुतः त्याला कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. तथापि विजयपुरातील काही नागरिकांशी संपर्क साधला असता त्यांनीही धरणीकंप झाल्याचे सांगितले.
सात रस्ता परिसरातील कृष्णा अपार्टमेंटमधील प्रमोद शास्त्री यांनी सांगितले की, आम्ही घरात झोपलो असताना आमची इमारत अचानक हादरायला लागली. साधारण चार मिनिटे ही कंपने जाणवली. लगेचच आम्ही घरातील सर्व मंडळी गॅलरीत याशिवाय भवानीपेठ परिसरातील आलो. समोर रस्त्यावर पाहिले तर रहिवाशांनीही हा हादरा म्हणजे समोरच्या इमारतीतील अनेक लोक भूकंपाचा धक्का असल्याचेच स्पष्ट रस्त्यावर आल्याचे दिसून आले. केले.