मोठी बातमी; १२ लाख रुपयांची कालबाह्य कीटकनाशके जप्त, कृषी विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 02:08 PM2020-09-16T14:08:08+5:302020-09-16T14:08:21+5:30

८८ प्रकारची मुदत बाह्य कीटकनाशकांची विक्री करणाºया विरूध्द गुन्हा दाखल...

Big news; Expired pesticides worth Rs 12 lakh seized in Pandharpur | मोठी बातमी; १२ लाख रुपयांची कालबाह्य कीटकनाशके जप्त, कृषी विभागाची कारवाई

मोठी बातमी; १२ लाख रुपयांची कालबाह्य कीटकनाशके जप्त, कृषी विभागाची कारवाई

Next

पंढरपूर : कासेगाव ( तालुका) कृषी केंद्र मध्ये मुदतबाह्य कीटकनाशकांचे विक्री करणाºया विरूध्द कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभागाच्या कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये १० ते १२ लाख रुपयांची ८८ प्रकारची कालबाह्य कीटकनाशके केली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी आर. वाय. पवार यांनी दिली.

कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभागाच्या पथकाने पंढरपूर तालुक्यातील शेतीसाठी लागणारे औषधे विक्री करणाºया दुकानाची नियमित असणारी तपासणी सुरू केली होती. तपासणीदरम्यान कासेगाव येथील फिरोज यासीन यासुफसाहेब शेख यांच्या कृषी मित्र अ‍ॅग्रो एजन्सी या कृषी केंद्रा मध्ये तपासणी केली.

यावेळी १० ते १२ लाख रुपयाचे कालबाह्य कीटकनाशके मिळून आले. हा सर्व मला कृषी विभागाने ताब्यात घेतला आहे. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र चंद्रहास माने, जिल्हा गुण  नियंत्रक निरीक्षक सागर भारवाकर,  तालुका कृषी अधिकारी राजेंद्र पवार, पंचायत समिती अधिकारी विजय मोरे, कृषी पर्यवेक्षक शशिकांत महामुनी, कृषी सहाय्यक सुनील प्रक्षाळे यांनी केली आहे. याबाबत फिरोज यासीन यासुफसाहेब शेख यांच्याविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Web Title: Big news; Expired pesticides worth Rs 12 lakh seized in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.