मोठी बातमी; पंढरपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २९१९ जणांना मिळणार कोरोनाचा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 05:38 PM2021-01-15T17:38:58+5:302021-01-15T17:39:59+5:30
पंढरपूर : पंढरपुर तालुक्यात आरोग्य सेवा पुरवणाºया २९१९ जणांना पहिल्या टप्प्यात कोरोनाचे लसीकरण होणार आहे. त्यासाठी पंढरपूर आरोग्य विभागाकडे ...
पंढरपूर : पंढरपुर तालुक्यात आरोग्य सेवा पुरवणाºया २९१९ जणांना पहिल्या टप्प्यात कोरोनाचे लसीकरण होणार आहे. त्यासाठी पंढरपूर आरोग्य विभागाकडे प्रथम टप्प्यात १६१० डोस उपलब्ध झाले आहे. शनिवारपासून रोज १०० व्यक्तींना कोरोनाचे लसीचे डोस उपजिल्हा रुग्णालय येथील संसर्गजन्य रुग्णालय येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत दिले जाणार असल्याचे प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
कोविडअॅपवर यादी संकलित करण्यात आली आहे. आरोग्य सेवेशी संबंधित १०० जणांना लस देण्यात येणार आहे. लस देण्यात येणाºया लाभार्थ्यांला रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक दिवस अगोदर वेळ व ठिकाणची माहिती देणारा संदेश येणार आहे. यासाठी संबधितांनी नोंदणी करताना जे ओळखपत्र जोडले आहे ते घेवन यावे. लाभार्थी लसीकरण कक्षात आल्यानंतर त्यांची माहिती घेतल्यानंतरच त्याना लसीकरण केले जाणार आहे. कोविड लस ही २ ते ८ डिग्री सेल्सीअस तापमाणात लस ठेवावी लागते. यामुळे लस ठेवण्यासाठी रेफ्रीजेटरची व्यवस्था उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे करण्यात आली.
आरोग्य विभागाने लसीकरणाच्या ठिकाणी लसीकरण कक्ष, निरिक्षण कक्ष तसेच रुग्णवाहिका सेवा सुसज्ज ठेवण्याबाबत दक्षता घ्यावी. तसेच आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवाव्यात अशा सूचनाही सचिन ढोले यांनी यावेळी दिल्या.
◼️भीती अथवा गैरसमज बाळगू नये
लसीकरण केल्यानंतर संबधितांना तज्ञ डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली अर्धा तास निरिक्षण कक्षात ठेवण्यात येणार आहे. लाभार्थी लसीकरण करुन घरी आल्यानंतरही त्यांना काही त्रास झाल्यास उपचार देण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने समिती स्थापन करण्यात आली आहे.यामध्ये शासकीय व खाजगी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबधितावर तज्ञ डॉकटरांकडून तात्काळ उपचार केले जाणार आहेत. याबाबत कोणतीही भीती अथवा गैरसमज बाळगू नये असे आवाहनही डॉ. एकनाथ बोधले व डॉ. अरविंद गिराम यांनी केले आहे.