मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्यात सोमवार, मंगळवार अन् बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 02:08 PM2020-10-18T14:08:37+5:302020-10-18T14:17:48+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Big news; Heavy rain expected in Solapur district on Monday, Tuesday and Wednesday | मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्यात सोमवार, मंगळवार अन् बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता

मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्यात सोमवार, मंगळवार अन् बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता

googlenewsNext

सोलापूर  : या आठवड्याच्या सुरुवातीला परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. अशात आता आणखी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  उद्या सोमवारी पुन्हा बंगालच्या उपसागरात मागील आठवड्यासारखा कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याचे संकेत असून त्यामुळे पुढील आठवड्यात देखील राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यात सोमवार, मंगळवार व बुधवारी पुन्हा जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

पावसामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतीचे अतोनात नुकसान झाले. नदी, नाल्यांना आलेले पूर आणि भिंती कोसळून काही नागरिकांचे बळी गेले. त्यातच आता सोमवारी पुन्हा बंगालच्या उपसागरात  कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने चिंता वाढली आहे. महाराष्ट्रावरून नुकताच गेलेला कमी दाबाचा पट्टा सध्या गुजरातकडे सरकला आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. आता 18 ते 21 ऑक्टोबरदरम्यान तमिळनाडू, आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि तेलंगणामध्ये मुसळधार, तर 20 ऑक्टोबरला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पट्ट्याची तीव्रता आणि त्याच्या प्रवासावर महाराष्ट्रावरील परिणाम ठरू शकणार असल्याचे मत हवामान विभागाने व्यक्त केले. 

----------------------------------- 

 + राज्यात या जिल्ह्यात पावसाची शक्यता
सोमवार- ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद.

-----------------------------------
मंगळवार - ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ.

-----------------------------------
बुधवार - ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी,लातूर, उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ.

Web Title: Big news; Heavy rain expected in Solapur district on Monday, Tuesday and Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.