मोठी बातमी; मंगळवेढा पोलीसांनी १२ तासाच्या आत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस केले जेरबंद

By Appasaheb.patil | Published: October 23, 2022 09:26 PM2022-10-23T21:26:16+5:302022-10-23T21:28:00+5:30

मंगळवेढा पोलीसांची विशेष कामगिरी

big news; Mangalvedha police arrested the accused in the crime of murder within 12 hours | मोठी बातमी; मंगळवेढा पोलीसांनी १२ तासाच्या आत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस केले जेरबंद

मोठी बातमी; मंगळवेढा पोलीसांनी १२ तासाच्या आत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस केले जेरबंद

googlenewsNext

सोलापूर : शेत जमिनीच्या कारणावरून मंगळवेढा तालुक्यात जावयाने सासूचा खून केला होता. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडले होती. या गुन्ह्यातील आरोपीस १२ तासाच्या आत जेरबंद करण्यात मंगळवेढा पोलिसांना यश आले आहे. 

दरम्यान, रविवारी २३ ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटेच्या सुमारास नंदेश्वर (तालुका मंगळवेढा) येथे शाकुबाई मारुती कोकरे (वय ४७ वर्ष रा. नंदेश्वर ता. मंगळवेढा) हिचा कोणी तरी रहात्या घरात गळ्यावर चाकूने वार करून अज्ञात चोर दरोडेखोराने खून केल्याची माहिती मंगळवेढा पोलीस ठाण्यास मिळाली होती. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ सदर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक रणजीत माने, सपोनि बामणे, सपोनि वाघमोडे, सपोनि आवटे, सपोनि पिंगळे, पोसई धापटे, पोसई शेख, पोहेकॉ गायकवाड, पोहेकॉ हेंबाडे, पोना पवार, पोना दुधाळ, पोना मोरे, पोकॉ  तांबोळी, पोकॉ माने यांनी घटनास्थळी धाव घेतली.  सदर पत्र्याच्या घरामध्ये मयत महिलेस टेकवुन बसविले होते व सदर महिलेचे गळ्यावर धारधार शस्त्राने (चाकुने वार केलेला होता. त्यामुळे तिचे केस, कपडे, अंतरुन रक्ताने माखलेले होते. व तिच्या बाजुस झोपलेल्या ठिकाणी एक धारदार मोठा चाकु रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेला दिसला.

त्यावेळी पोलीसांनी तेथील लोकांकडे चौकशी केली असता घरामध्ये चोर दरोडेखोर घुसुन मारुन पळुन जात होते, त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठीमागे घराच्या मागे गेलो असता लाईट बॅटऱ्या चमकलेल्या दिसल्या असे सांगीतले. पोलीसांनी त्याप्रमाणे तपास केला, परंतु काही एक उपयुक्त माहिती मिळाली नाही. त्यामुळे तेथील घटनास्थळाचा व परिस्थितीचा अभ्यास करुन मयताचा जावई दादा उर्फ राजाराम बाबुराव शेजाळ याच्यांकडे व त्याच्या पत्नीकडे चौकशी केली असता त्या दोघांच्या बोलण्यामध्ये तफावत आढळुन आली. त्यावेळी पोलीसांना जावईचा संशय आल्याने त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता मयताचा जावाई दादा उर्फ राजाराम बाबुराव शेजाळ याने शाकुबाई हिचे वडील राजाराम शेजाळ यांचे नावे असलेली पाच एकर जमीन नावावर करण्याकरिता अंगठा का देत नाही, या कारणावरून शाकुबाईचे गळ्यावर चाकु भोकसुन तिचा खून करुन अज्ञात चोरट्याने खुन केल्याचा बनाव केल्याचे निष्पण झाले. आरोपी दादा उर्फ राजाराम बाबुराव शेजाळ यांने या गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास पोलीसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सपोनि बामणे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, सपोनि अमोल बामणे, सपोनि अंकुश वाघमोडे, सपोनि सत्यजित आवटे, सपोनि बापुराव पिंगळे, पोसई धापटे, पोसई सलिम शेख, सपोफौ दत्तात्रय तोंडले, सपोफौ पाटील, पोहेकॉ सुनिल गायकवाड, पोहेकॉ दयानंद हेंबाडे, पोना बापुराव पवार, पोना ईश्वर दुधाळ, पोना सुनिल मोरे, पोकॉ रफिक तांबोळी, पोका सोमनाथ माने पोकॉ राजु आवटे यांनी सदर गुन्ह्याचे तपास कामी मदत केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अमोल बामणे, मंगळवेढा पोलीस ठाणे हे करीत आहेत.

Web Title: big news; Mangalvedha police arrested the accused in the crime of murder within 12 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.