मोठी बातमी; सोलापुरात रविवारी मराठा क्रांती आक्रोश मोर्चा निघणार; नरेंद्र पाटलांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 12:45 PM2021-07-02T12:45:29+5:302021-07-02T12:45:36+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
सोलापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने रविवार ४ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजता सोलापुरात विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील हा सर्वात मोठा मोर्चा राहणार असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.
केवळ मराठा समाजच नाही तर शेतकरीही या मोर्चात सहभागी होणार आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होईल. या मोर्चासाठी आम्ही खासदार नारायण राणे, छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना निमंत्रण दिल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले. याशिवाय केंद्रीय कायदा मंत्री यांची भेटीसाठी वेळ घेऊन त्यांना मराठा आरक्षणाबाबत कायदा करण्यासाठी विनंती करणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
नरेंद्र पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे...
- राज्यशासनाने तात्काळ मागासवर्गीय आयोगाला ॲक्टिव्ह करावे
- मागासवर्गीय आयोगाकडून सर्व्हे करायला हवेत
- लवकरात लवकर मागासवर्गीय अहवाल तयार करावा
- राज्यपालांची, पंतप्रधानांची मदत घ्यावी पण आरक्षण द्यावी
- आमच्या आंदोलनाची सुरुवात सोलापुरातून आहे मात्र महाराष्ट्रात सर्वत्र मोर्चा निघणार आहे
- काही लोक वेगळा रंग लावत आहेत मात्र आमचा मोर्चा सर्वपक्षीय आहे
- आज सुशीलकुमार शिंदे यांना भेटलो तसेच जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांना भेटलो
- राज्य शासनाने कोणतीही भरती काढू नये अन्यथा तुमची भूमिका मराठा द्वेष्टी आहे असे दिसेल