मोठी बातमी; पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालकेंना उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 05:10 PM2021-03-29T17:10:23+5:302021-03-29T17:21:26+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Big news; NCP nominates Bhagirath Bhalke for Pandharpur-Mangalwedha constituency | मोठी बातमी; पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालकेंना उमेदवारी

मोठी बातमी; पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालकेंना उमेदवारी

Next

सोलापूर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल मिडियावरून दिली. 

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचं निधन झाल्याने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या मतदारसंघात आता १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत असून, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार निश्चितबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. उमेदवारीबद्दल चर्चा सुरू झाल्यानंतर भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, त्यांच्या उमेदवारीला पक्षातीलच काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या निर्णयाकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं.

जयंत पाटील यांनी ट्वीट करून भगीरथ भालके यांच्या नावाची घोषणा केली आणि त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. "शरद पवार यांच्या मान्यतेनं पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात येत आहेत. ते नक्की विजय होतील, असा आम्हाला विश्वास आहे. भगीरथ भालके यांना शुभेच्छा!," असं पाटील यांनी म्हटलं आहे.

Web Title: Big news; NCP nominates Bhagirath Bhalke for Pandharpur-Mangalwedha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.