मोठी बातमी; ७ मार्चपर्यंत सोलापुरात रात्रीची संचारबंदी; शाळा, महाविद्यालयही राहणार बंद
By Appasaheb.patil | Published: February 24, 2021 03:17 PM2021-02-24T15:17:10+5:302021-02-24T15:56:24+5:30
पालकमंत्र्यांची माहिती; कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाचे मोठे पाऊल
सोलापूर - कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता सोलापूर शहर व जिल्ह्यात आज २४ फेब्रुवारीपासून रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. ही संचारबंदी ७ मार्चपर्यंत असणार आहे. याशिवाय ७ मार्चपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे...
- - आजपासून सोलापुरात 7 मार्चपर्यंत कडक रात्र संचारबंदी
- - आज मध्यरात्रीपासून रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी
- - कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शहर आणि जिल्ह्यातील टेस्टींग वाढविणार
- - शाळा-महाविद्यालय 7 मार्चपर्यंत बंद राहणार
- - 10 वी आणि 12 चे वर्ग सुरु राहणार
- - क्रिडांगणावर 7 मार्चपर्यंत कोणत्याही क्रिडा स्पर्धा भरवण्यास बंदी
- - लग्नसमारंभासाठी 50 लोकांची मर्यादा
- - कोव्हिड केअर सेंटर, डेडिकेटेड कोव्हिड सेंटर वाढविणार
- - कर्नाटकातून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य