मोठी बातमी; आता पोस्टमनच्या मदतीने घरी बसूनच करा राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 06:04 PM2021-08-17T18:04:08+5:302021-08-17T18:04:16+5:30

आधार कार्डातही बदल शक्य : पोस्ट अधीक्षकपदी व्यंकटेश रेड्डी

Big news; Now do the transactions of nationalized banks from home with the help of postman | मोठी बातमी; आता पोस्टमनच्या मदतीने घरी बसूनच करा राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवहार

मोठी बातमी; आता पोस्टमनच्या मदतीने घरी बसूनच करा राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवहार

googlenewsNext

सोलापूर : आता पोस्टाचे व्यवहार हे फक्त पत्र पाठवणे यापर्यंत राहणार नाहीत. पोस्टमनच्या माध्यमातून कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवहार करण्याची सुविधा आता ग्राहकांना मिळणार असल्याची माहिती वरिष्ठ पोस्ट अधीक्षक व्यंकटेश यांनी दिली.

बँकांमध्ये पैसै काढणे किंवा भरण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक किंवा पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज अकाऊंट असणे गरजेचे आहे. हे अकाऊंट असल्यास ग्राहकाला बँकेत जाण्याची गरज नाही. यासाठी घरोघरी जाणाऱ्या पोस्टमनची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी पोस्टमनला प्रशिक्षण दिले आहे. पोस्टमनच्या माध्यमातून आधार कार्ड अपडेट करणे, आधार कार्ड संलग्न असलेला मोबाईल नंबर बदलणे किंवा अपडेट करण्यास सुरुवात झाली आहे. सध्या ३० पोस्टमन हे काम करत असून एका आठवड्यात ३०० पोस्टमन हे काम सुरु करतील. यासाठी ५० रुपये खर्च येणार आहे. पाच वर्षा पुढील नागरिकांचे नवीन आधार कार्ड हे पोस्ट ऑफिसमधूनच मिळणार असताना पाच वर्षांच्या आतील मुलांचे आधार कार्ड पोस्टमन घरी जाऊन तयार करु शकणार आहेत.

---------

३० वर्षांनंतर सोलापूरला मिळाले आयपीओ दर्जाचे अधिकारी

पोस्टामधील वरिष्ठ पोस्ट अधीक्षक हे पद यूपीएससीच्या माध्यमातून भरण्यात येते. १९९१ रोजी सोलापुरात शेवटच्या वरिष्ठ पोस्ट अधीक्षकांनी काम केले. त्यानंतर मात्र प्रभारी किंवा इतर अधिकाऱ्यांनी हा भार वाहिला. ३० वर्षानंतर सोलापूरला व्यंकटेश रेड्डी हे वरिष्ठ पोस्ट अधीक्षक म्हणून काम करत आहेत. नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला.

चार हजार नागरिकांनी पाठवले ऑलिम्पिक विजेत्यांना पत्र

ऑलिम्पिक विजेत्यांना शुभेच्छा देण्याची संधी पोस्ट ऑफिसने दिली होती. तीन दिवस चाललेल्या या योजनेत सोलापुरातून चार हजार नागरिकांनी ऑलिम्पिक विजेत्यांना पत्र पाठविले. पोस्टात येऊन शुभेच्छा देणे, तसेच इ मेलच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूच्या घरपोच शुभेच्छा पत्र पाठविणे याचा त्यात समावेश होता.

दहा मिनिटात मिळेल स्वत:च्या फोटोचे तिकीट

पत्रासोबत अनेकदा तिकीट लावावे लागते. ही तिकिटे महापुरुष, राष्ट्रीय उद्याने आदींच्या छायाचित्रांची असतात. त्याऐवजी आपण आपला फोटो असलेले तिकीटही पाठवू शकतो. सध्या राखी पौर्णिमेनिमित्त पोस्ट ऑफिसमधून ही सुविधा देण्यात येत आहे. यासाठी पोस्ट कार्यालयातर्फे शुल्क आकारले जात आहे.

Web Title: Big news; Now do the transactions of nationalized banks from home with the help of postman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.