मोठी बातमी; अवैध वृक्षतोड घेऊन निघालेली वाहतूक रोखली; लाकडासह चार वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2022 11:33 AM2022-02-26T11:33:41+5:302022-02-26T11:34:26+5:30

अक्कलकोट तालुक्यातील कारवाई; अवैध झाडांची कत्तल करण्याऱ्यामध्ये उडाली खळबळ

Big news; Prevented illegal logging; Four vehicles with timber seized | मोठी बातमी; अवैध वृक्षतोड घेऊन निघालेली वाहतूक रोखली; लाकडासह चार वाहने जप्त

मोठी बातमी; अवैध वृक्षतोड घेऊन निघालेली वाहतूक रोखली; लाकडासह चार वाहने जप्त

Next

उडगी:-सिद्धू पुजारी

अक्कलकोट तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून दररोज शेकडो अवैध झाडांची कत्तल खुलेआम होत असल्याबाबतचा  दै. लोकमतमध्ये 'तोडलं झाडं, भरलं ट्रॅक्टरमध्ये अन निघाली विक्रीला'या मथळ्याखाली  आवाज उठवला होता. त्यानंतर वनविभाग खडबडून जागे होऊन तात्काळ लोकमतच्या बातमीची दखल घेऊन गुरुवार 24 फेब्रुवारी रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून अक्कलकोट परीमंडळांतर्गत असलेल्या मैंदर्गी व वागदरी नियतक्षेत्रात वनपाल अक्कलकोट, वनरक्षक वागदरी, वनरक्षक मैंदर्गी, वनरक्षक गंगाधर कणबस हे फिरती करत असताना विनापरवाना वृक्षतोड करून व तसेच अवैध वाहतूक करताना लिंब, बाभळ, सुबाभळ या प्रजातीच्या जळाऊ सरपण वाहनासह पकडले.

भारतीय वनअधिनियम १९९७ चे कलम ४१,४२ अन्यवे संबंधित आरोपी अश्पाक रसूल मुल्ला,संजय बिरप्पा हालमत्ते, गुडुभाई सय्यद फुलारी, संतोष सिद्धू व्हनमाने यांना ताब्यात घेऊन कारवाईसाठी ही वाहने कार्यालयाच्या आवारात आणून  सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे.    

सदरची कारवाई धैर्यशील पाटील उपवनसंरक्षक वनविभाग सोलापूर व एल. ए. आवारे सहाय्यक वनसंरक्षक रोयहो यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक खलाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी रोहयो आर. जे. कांबळे वनपरिमंडळ अधिकारी अक्कलकोट, जी.एल.विभूते वनरक्षक वागदरी, एस.एस. मेंगाळ, वनरक्षक मैंदर्गी बी. एम. भोई वनरक्षक यांच्यासह वनकर्मचारीचे पथक यांनी कारवाई पूर्ण केली. पुढील तपास चालू आहे.


या कारवाईने  अक्कलकोट तालुक्यात अवैध झाडांची कत्तल करणाऱ्यासह लाकडांचा व्यवसाय करणाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: Big news; Prevented illegal logging; Four vehicles with timber seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.